आयपीएल २०२१ कोलकाता विरुद्ध दिल्ली उपांत्य फेरीच्या सामन्यात नाणेफेक जिंकत कोलकाताने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.दिल्लीने २० षटकात ५ गडी गमवत १३५ धावा केल्या. कोलकात्याला विजयासाठी १३६ धावांचं आव्हान दिलं आहे. या सामन्यात दिल्लीची सुरुवात संथगतीने झाली. दिल्लीची ४ गडी बाद झाल्यानंतर दिल्ली संघावर दडपण आलं. त्यामुळे शिमरोन हेटमायर याच्या खेळीकडे मोठ्या अपेक्षेनं पाहिलं जात होतं. मात्र वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर उंच फटका मारल्यानंतर सीमेवर शुभमन गिलनं त्याचा झेल घेतला. मात्र कोलकात्याचा आनंद फार काळ टिकू शकला नाही. तिसऱ्या पंचांनी रिव्ह्यू बघितल्यानंतर नो बॉल असल्याचं स्पष्ट झालं आणि सीमेवर असलेल्या पंच अनिल यांनी त्याला पुन्हा मैदानात पाठवले.

कोलकात्याने १६ षटक वरुण चक्रवर्तीला सोपवलं होतं. वरुण चक्रवर्तीने चेंडू टाकल्यानंतर हेटमायरने उंच फटकावला. शुभमन गिलनं त्याचा झेल घेतला. त्यानंतर हेटमायर तंबूच्या दिशेने निघाला. मात्र अंपायरनं नो बॉल आहे की नाही यासाठी तिसऱ्या पंचांची मदत घेतली. यात वरुण चक्रवर्तीने टाकलेला चेंडू नो बॉल असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर हेटमायरला पुन्हा एकदा खेळण्याची संधी मिळाली. मात्र हेटमायर मिळालेल्या संधीचं सोनं करू शकला नाही. शिमरोन हेटमायरला वेंकटेश अय्यरने धावचीत केलं. हेटमायर १० चेंडूत १७ धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत २ षटकार ठोकले.

नियमानुसार कोणताही फलंदाज डगआऊट निघून मैदानात पाय ठेवल्यास तर तो पुन्हा माघारी जाऊ शकत ना्ही. कोणताही संघ ड्रेसिंग रुम किंवा डगआऊटमध्येच फलंदाज बदलण्याचा निर्णय घेऊ शकते. एकदा का मैदानातील सीमारेषेत पाय ठेवला. तर मात्र बदल करता येत नाही. तसाच फलंदाज बाद होण्याचाही निर्णय आहे. जर कोणता फलंदाज तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची वाट न पाहता सीमारेषेबाहेर पाय ठेवतो आणि तिसऱ्या पंचाचा निर्णय नॉटआऊट असेल. तर त्या फलंदाजाला मैदानात पुन्हा बोलवलं जात नाही. मात्र या वेळी तिसऱ्या पंचांनी निर्णय दिल्याने हेटमायरला पुन्हा खेळण्याची संधी मिळाली.

दिल्ली कॅपिटल्स – ऋषभ पंत (कप्तान आणि यष्टीरक्षक), शिखर धवन, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, शिमरोन हेटमायर, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, कगिसो रबाडा, मार्कस स्‍टॉइनिस, आवेश खान, एनरिक नॉर्किया.

कोलकाता नाइट रायडर्स – ईऑन मॉर्गन (कप्तान), शुबमन गिल, व्यंकटेश अय्यर, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), शाकिब अल हसन, सुनील नरिन, लॉकी फर्ग्यूसन, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती.

Story img Loader