क्रिकेटच्या भल्यासाठीच शिवसेना मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) निवडणुकीत सहभागी झाली आहे, असा दावा आमदार प्रताप सरनाईक करीत आहे; परंतु युती एमसीएच्या रिंगणातही दाखवू, अशी आशा
राज्यात तुमचे युतीचे सरकार आहे, पण शिवसेना एमसीएच्या निवडणुकीत तुमच्यासोबत नाही. याबाबत काय सांगाल?
मुळातच एमसीएची निवडणूक मी राजकारणाचा भाग मानतच नाही. मी अनेक वष्रे बाळ म्हाडदळकर गटाचा सदस्य आहे. याच नात्याने मी उपाध्यक्षपदासाठी निवडणूक लढत आहे. मी विविध समित्यांवरही कार्य केले आहे. भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस किंवा शिवसेना अशी पक्षीय भावनेने या निवडणुकीकडे मी पाहत नाही.
तुम्हाला उपाध्यक्षपदाची एक जागा देऊ केल्याचे, एमसीएच्या राजकारणातसुद्धा युती टिकण्यासाठी प्रयत्न केल्याचे प्रताप सरनाईक सांगतात..
माझ्यापुढे प्रस्ताव ठेवणारे सरनाईक कोण? आणि राजकीय दृष्टय़ा सांगायचे, तर शिवसेनेचे सर्व वरिष्ठ नेते मुख्यमंत्र्यांकडे गेले होते. युतीचे सर्व जण एकत्रित लढू अशी आशा त्यांनी आधी निर्माण केली. मग परस्पर पाठ दाखवत, काँग्रेसच्या विजय पाटील यांच्याशी संधान साधले. त्यानंतर आपल्या नेत्यांचे अर्जसुद्धा भरून टाकले. हे सारे घडल्यानंतर अशा प्रकारे आव्हानात्मक निवेदन करणे हे कितपत विश्वासार्ह आहे?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा