जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या शिवा थापाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. मात्र रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याची आणखी एक संधी शिवाला मिळणार आहे. ५६ किलो वजनी गटातून खेळताना उझबेकिस्तानच्या मुरोजोन अखमाडालिव्हने शिवावर २-१ असा विजय मिळवला. या गटातून ऑलिम्पिकसाठी पात्र होण्याची आणखी तीन बॉक्सिंगपटूंना संधी असल्याने शिवा ‘बॉक्स ऑफ’ लढतीत खेळणार आहे. ‘‘मी सर्वोत्तम प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते पुरेसे ठरले नाही. हा पराभव निराशाजनक आहे. मात्र रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याची मला अजूनही संधी आहे,’’ असे शिवाने सांगितले.

Story img Loader