IPL Auction 2021 : मुंबईचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे याला राजस्थान रॉयल्सने ४ कोटी ४० लाख रुपयांची बोली लावत आपल्या चमूमध्ये दाखल करुन घेतलं आहे. ५० लाख रुपये मूळ किंमत असणाऱ्या शिवम दुबेसाठी दिल्ली तीन कोटी ८० आणि हैदराबाद तीन कोटी ४० लाख रुपये खर्च करण्यास तयार होते. मात्र, राजस्थान संघानं ४ कोटी ४० लाख रुपयांची बोली लावत आपल्या ताफ्यात घेतलं. शिवम दुबेला विराट कोहलीच्या आरसीबी संघानं यंदा करारमुक्त केलं होतं.
२०१६ मध्ये मुंबईकडून शिवम दुबे यानं आपल्या देशांतर्गत क्रिकेटला सुरुवात केली होती. मुंबईकडून शिवम दुबेनं ५५ टी-२० ६९० धावा चोपल्या आहेत. शिवाय ३२ बळीही घेतले आहेत.
Shivam Dube goes to @rajasthanroyals for INR 4.4 Cr at the @Vivo_India #IPLAuction. pic.twitter.com/cpsCHAGo1T
— IndianPremierLeague (@IPL) February 18, 2021
आयपीएलमध्ये शिवम दुबे यानं सरासरी कामगिरी केली आहे. २०१९ मध्ये दुबे पहिल्यांदा आयपीएलच्या मैदानात उतरला होता. आयपीएलच्या १५ सामन्यात दुबेनं १६९ धावा केल्या आहेत. शिवाय ४ बळीही घेतले आहे.