सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणानंतर एन. श्रीनिवासन यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, तर जगातील सर्वात श्रीमंत संघटना असलेल्या बीसीसीआयचा पुढील अध्यक्ष कोण, हा प्रश्न विचारला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने श्रीनिवासन यांना अध्यक्षपदावरून पायउतार होण्यास सांगितले आहे. त्यामुळे श्रीनिवासन यांच्यासमोर राजीनामा देण्यावाचून कोणताही पर्याय उरलेला नाही, असे बीसीसीआयच्या काही सदस्यांचे म्हणणे आहे.
अध्यक्षपदाच्या जागेसाठी बीसीसीआयच्या विभागीय रोटेशन पद्धतीनुसार, दक्षिण विभागाच्या तीन वर्षांच्या कार्यकाळाचे हे अखेरचे वर्ष आहे. त्यामुळे तामिळनाडू, कर्नाटक, हैदराबाद, आंध्र प्रदेश, केरळ आणि गोवा या दक्षिण विभागातील सहा असोसिएशन्सना नवा अध्यक्ष निवडून द्यावा लागणार आहे. दक्षिण विभागाचे एकही मत न फुटल्यास, शिवलाल यादव हे अध्यक्षपदी बिनविरोध निवडून येऊ शकतात. यादव यांचे बीसीसीआयमध्ये वजन असले तरी आयसीसीच्या बैठकीत मुद्दे मांडण्याची वक्तृत्व शैली नसल्यामुळे त्यांना विरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा