Shoaib Akhtar on Yuzvendra Chahal: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) नुकतीच एकदिवसीय विश्वचषक २०२३साठी भारताच्या १५ सदस्यीय संघाची घोषणा केली. ही स्पर्धा भारतात आयोजित केली जाणार असून त्याचे यजमानपद हे टीम इंडियाला मिळाले आहे. ५ ऑक्टोबरपासून विश्वचषक २०२३ या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्वचषकासाठी निवडलेल्या संघात स्थान मिळवण्यात यश आले, तर काही खेळाडूंना संघातून वगळण्यात आले. टीम इंडियाच्या या संघ निवडीवर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने टीका केली आहे.

बीसीसीआयने ज्या काही खेळाडूंना संघातून वगळले आहे या खेळाडूंपैकी एक लेग-स्पिनर युजवेंद्र चहल आहे, जो विश्वचषकापूर्वी टीम इंडियाचा नियमित सदस्य होता. मात्र, अलीकडच्या काळात खराब फॉर्ममुळे त्याला संघातून वगळण्यात आले आहे. चहलच्या हकालपट्टीवर शोएब अख्तर संतापला. म्हणाला, “अष्टपैलू खेळाडूंद्वारे टीम इंडिया त्यांची फलंदाजी मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. हा अतिशय चुकीचा विचार असून यामुळे ते स्वतःच स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेत आहे.” शोएबने भारताच्या धोरणावर टीका केली आहे.

aishwarya rai and abhishek bachchan
“सेटवर आम्ही कधीच त्यांना…”, ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनबाबत अभिनेता म्हणाला, “त्यांच्या नात्यामुळे…”
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
KL Rahul Statement on Sanjiv Goenka Animated Chat in IPL 2024 loss Said Wasn’t the nicest thing Ahead
KL Rahul: “मैदानावर जे काही घडलं ते फार चांगलं…”, संजीव गोयंका भर मैदानात भडकल्याच्या घटनेवर केएल राहुलने पहिल्यांदाच केलं वक्तव्य
What Sharad Pawar Said?
Sharad Pawar : “मोदी ४०० हून अधिक जागांची मागणी करत होते कारण..”, शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
Sule indirectly attacked Ajit Pawar and his supporters during speech
“आजकाल भाषण करतांना काळजी घ्यावी लागते” सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
Gautam Gambhir Statement on Ricky Ponting Over Virat Kohli Rohit Sharma Criticism Said What does Ponting to has to do with Indian cricket
Gautam Gambhir: “पॉन्टिंगचा भारतीय क्रिकेटशी काय संबंध? त्याने तर…”; रोहित-विराटबद्दल केलेल्या वक्तव्यावर गंभीर संतापला
Vishwajeet Kadam jayshri patil
Vishwajeet Kadam: जयश्री पाटील यांना बंडखोरीस भाग पाडले – विश्वजित कदम
devendra fadnavis criticize sanjay raut in nagpur
“संजय राऊतांसारख्या लोकांना मी…”, देवेंद्र फडणवीस यांची टीका; म्हणाले, “ते माझ्या उंचीचे…”

टीम इंडियाला एका गोलंदाजाची कमतरता आहे – शोएब अख्तर

स्टार स्पोर्ट्सने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात शोएब अख्तर म्हणाला, “भारताने युजवेंद्र चहलची निवड का केली नाही, हे माझ्या समजण्यापलीकडे आहे. जेव्हा भारतीय संघ अडचणीत येईल १५० किंवा २०० धावांवर बाद होईल तेव्हा, फलंदाजांना नाही तर गोलंदाजांवर अधिक जबाबदारी येते. तुम्ही तुमची बॅटिंग लाइनअप अजून कुठपर्यंत खेचणार आहात? जर पहिले पाच फलंदाज काहीही करू शकत नसतील तर ७ किंवा ८ क्रमांकाचे काय करणार? त्यामुळे, माझ्यामते तुम्ही कमी गोलंदाजासोबत खेळत आहात.”

शोएब अख्तर पुढे म्हणाला की, “भारताने त्यांच्या गोलंदाजीत वैविध्य आणण्यासाठी डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगची निवड करायला हवी होती. मला वाटते की अर्शदीप संघात असावा कारण, दबावाखाली जेव्हा तुम्ही पाकिस्तानसारख्या संघाविरुद्ध खेळत असता तेव्हा तुम्हाला डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाची गरज भासते. त्याने २०२२ टी२० वर्ल्डकपमध्ये शानदार गोलंदाजी केली होती.”

अर्शदीप सिंगला वन डेत अद्याप एकही विकेट घेता आलेली नाही

अर्शदीप जुलै २०२२ मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केल्यापासून टी२०मध्ये जबरदस्त कामगिरी करत आहे. डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने या फॉरमॅटमध्ये ३३ सामन्यांत १८.९८च्या सरासरीने ५० विकेट्स घेतले आहेत. मात्र, वन डेमध्ये तीन सामने खेळूनही एकही विकेट घेता आलेली नाही. दुसरीकडे, युजवेंद्र चहलने २०२१ पासून एकदिवसीय फॉरमॅटमध्ये १८ सामन्यांत २९ विकेट्स घेतले आहेत.

हेही वाचा: IND vs PAK: विश्वचषकाआधी शोएब-हरभजनमध्ये जुंपली; अख्तर म्हणाला, “वर्ल्ड कपमधून आम्ही टीम इंडियाला…”

भारतीय संघाची प्लेईंग ११ स्थिर नाही

शोएब अख्तर म्हणाला की, “भारतीय संघाची प्लेईंग ११ गेल्या दोन वर्षांपासून स्थिर नाही, हे माझ्यासाठी खूप विचित्र आहे. कारण, तुम्हाला माहीत नाही की कोण कोणत्या नंबरवर खेळणार आहे. त्यात जर संघात वरिष्ठ खेळाडू असतील तर त्यांना कुठल्याही क्रमांकवर खेळवता येणार नाही. त्यामुळे रोहित आणि विराटला चांगले खेळावे लागेल.” भारताचा पाकिस्तान विरुद्धचा सामना १४ ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथे होणार आहे.