सोमवारी झालेल्या अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान सामन्यात आपल्या संघाला पराभवाचा फटका बसल्यामुळे रावळपिंडी एक्स्प्रेस शोएब अख्तर चांगलाच भडकला आहे. अफगाणिस्ताननं पाकिस्तानला तब्बल ८ विकेट्स राखून पराभूत करत वर्ल्डकपमध्ये आणखी एका धक्कादायक निकालाची नोंद केली. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात त्यांनी इंग्लंडलाही पराभवाचं पाणी पाजलं. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या संघाचा झालेला पराभव शोएब अख्तरच्या जिव्हारी लागला असून यासाठी त्यानं पाकिस्तान क्रिकेट बोर्ड व बोर्डातल्या पदाधिकाऱ्यांना जबाबदार धरलं आहे.

एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये शोएब अख्तरनं पाकिस्तानच्या पराभवावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या मुलाखतीतला एक व्हिडीओ शोएब अख्तरनं त्याच्या एक्सवरील (ट्विटर) अकाऊंटवरही शेअर केला आहे. “जोपर्यंत आपण सामान्य दर्जाच्या लोकांना चुकीच्या ठिकाणी बसवत राहू, तोपर्यंत त्याचे असेच परिणाम आपल्याला दिसत राहणार”, असं शोएब या मुलाखतीत म्हणाला आहे.

Shahid Afriadi breaks silence on relationship rumours with Sonali Bendre
सोनाली बेंद्रेबरोबरच्या अफेअरबद्दल विचारताच पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी म्हणाला, “आता आम्ही…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
Shashank Arora
“आम्ही वाळवंटात भारत-पाकिस्तानच्या बॉर्डरजवळ…”, इरफान खान यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत अभिनेता म्हणाला, “मला पतंग…”
salman khan mother danching with helan
Video : सलमान खानच्या आईने हेलन यांच्याबरोबर धरला ठेका; उपस्थितही पाहतच राहिले, व्हिडीओ होतोय व्हायरल
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
Iltija Mufti news
Iltija Mufti : “हिंदुत्व हा एक आजार, कारण..”; रतलामचा व्हिडीओ पोस्ट करत इल्तिजा मुफ्ती यांचं वादग्रस्त वक्तव्य

“कधीपर्यंत अशा लोकांना पाठिंबा देत राहणार?”

“आपल्या संघाची ही कामगिरी पाहिल्यानंतर तुम्ही त्यावर काहीही बोलू शकत नाही. कृपा करून योग्य व्यक्ती योग्य जागेवर बसवा. कुणीही क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष होतोय. तुम्ही आणखी किती काळ अशा सामान्य दर्जाच्या व्यक्तींकडे कारभार देणार आहात. जोपर्यंत असे सामान्य दर्जाचे लोक महत्त्वाच्या पदांवर बसतील, तोपर्यंत तुम्हाला अशीच सामान्य दर्जाची कामगिरी दिसत राहील”, अशा शब्दांत शोएब अख्तरनं आपला संताप व्यक्त केला आहे.

Video: इरफान पठाननं दिलेला शब्द पाळला; राशिद खान समोर येताच धरला ठेका अन्…

“मला पाकिस्तानच्या संघातला एक खेळाडू सांगा जो…”

“आज तुम्हाला टीव्हीवर जे दिसलं, ते पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचं खऱ्या अर्थानं प्रतिबिंब आहे. गेल्या २०-३० वर्षांपासून तुम्ही घेत असलेल्या निर्णयांचा हा थेट परिणाम आहे. सध्या पाकिस्तान क्रिकेट टीममध्ये असा एकही खेळाडू नाहीये जो लहान मुलांना क्रिकेटपटू होण्यासाठी प्रोत्साहन देऊ शकेल. मी वकार युनिस, वासिम अक्रम, इम्रान खान, स्टीव्ह वॉ, अॅलन बॉर्डर, विव्ह रिचर्ड्स असे खेळाडू पाहिले आहेत. मला पाकिस्तानच्या आत्ताच्या टीममधला एक खेळाडू सांगा, जो लहान मुलांना क्रिकेटची निवड करण्यासाठी प्रोत्साहित करू शकेल”, असं शोएब अख्तर म्हणाला.

“मला खूप दु:ख होतंय”

“मी पाकिस्तानसाठी खेळलो आहे. मला आत्ता खूप दु:ख होतंय. मी कायम पाकिस्तानलाच समर्थन देत राहीन. जर मी आत्ता बाबरसोबत असतो, तर मी त्याला सांगितलं असतं की कर्णधार म्हणून तू पुढाकार घे. अफगाणिस्तानविरुद्ध जे घडलं ते सर्वात वाईट आहे. आता आपण उरलेले चारही सामने जिंकायला हवेत”, असंही शोएब अख्तरनं नमूद केलं.

शोएब अख्तरचा बाबरला सल्ला

दरम्यान, साखळी फेरीतील उरलेले सगळे सामने जिंकण्यासाठी शोएब अख्तरनं बाबर आझमला सल्ला दिला आहे. “जर बाबर माझे व्हिडीओ बघतोय, त्याला हे सगळं बिघडल्याचं पटतंय तर त्यानं वेळीच निर्णय घ्यावा. योग्य खेळाडूंना संघात घ्यावं. फखरला परत आण. त्याला समोरच्या संघावर आक्रमण करण्याची परवानगी दे. झमानलाही संघात घे. इतर काही पर्यायांचा विचार कर. आक्रमक क्रिकेट खेळा. बाबरनंही १२०च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी करायला हवी. पाकिस्तान सध्या ८०-९० च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी करत आहे. गुरबाझ १२२ च्या स्ट्राईकरेटनं खेळत होता. पाकिस्ताननं प्रत्येक सामन्यात जवळपास १५० चेंडू निर्धाव खेळून काढले आहेत. आम्हाला आता भीती वाटतेय”, अशा शब्दांत शोएब अख्तरनं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

“बाबरमध्ये हिंमत आहे का? त्याच्यात तेवढा स्टॅमिना आहे का? त्याला आपल्या क्षमतेवर विश्वास आहे का? १९९२ साली इम्रान खाननं जे केलं, ते तो करू शकतो का? शाहीन आफ्रिदी दुसरा वासिम अक्रम बनू शकतो का? हॅरिस रौफ अकिब जावेद बनू शकतो का? शादाब मुश्ताक अहमद होऊ शकतो का? हा संघ हे करू शकतो का? माझा या संघावर विश्वास आहे. पण त्यांचा स्वत:वर विश्वास आहे का? ईश्वरालाच ठाऊक”, असंही शोएब अख्तरनं नमूद केलं.

Story img Loader