कसोटी क्रिकेट सामना म्हणजे पाच दिवस हे समीकरण आहे. वर्षानुवर्षे क्रिकेट विश्वात पाच दिवसाचा कसोटी क्रिकेट सामना खेळला जातो आहे. मात्र लवकरच आंतरराष्ट्रीय कसोटी सामने हे चार दिवसांचे करण्याचा विचार ICC करत आहे. प्रत्येक वर्षातील प्रचंड गजबजलेले क्रिकेट दौरे लक्षात घेता ICC कसोटी क्रिकेट सामन्याचे स्वरूप बदलून ते ४ दिवसांचे करण्याचा विचार करत आहे. याबाबत पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने महत्त्वाचे विधान केले आहे .
काय आहे ICC चा प्लॅन; ४ दिवसांचा होणार कसोटी सामना?
“BCCI च्या अध्यक्षपदी सध्या माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली आहे. गांगुली हा अत्यंत हुशार आणि प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्व आहे. BCCI च्या सहमतीशिवाय ICC चार दिवसांचा कसोटी क्रिकेट सामना हा प्रस्ताव अंमलात आणू शकत नाही. आणि कसोटी क्रिकेट अशा पद्धतीने वाईट अवस्थेत जाताना पाहणं गांगुलीला नक्कीच आवडणार नाही. कसोटी क्रिकेट जिवंत ठेवण्यासाठी तो कायम प्रयत्नशील राहिल. कसोटी क्रिकेटला गांगुली धक्का लागू देणार नाही”, असा विश्वास अख्तरने व्यक्त केला.
VIDEO : जेव्हा अख्खं स्टेडियम एकत्र ‘वंदे मातरम’चा जयघोष करतं…
“प्रत्येक ठिकाणी काही ना काही कट शिजत आहेत. ICC चा चार दिवसाचा कसोटी सामना करण्याचा प्रस्ताव हा माझ्या मते आशियाई संघांच्या विरोधात जाणारा आहे. चार दिवसांचा कसोटी सामना ही कल्पना अत्यंत चुकीची आहे. या कल्पेनेत कोणलाही रस असणार नाही. सध्या क्रिकेटमधील जुने-जाणते तज्ञ्ज तसेच बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंकेतील माजी फिरकीपटू या कल्पनेच्या विरोधात आहेत. BCCI देखील या प्रस्तावाला विरोधच करेल असा मला विश्वास आहे. BCCI असं काहीही होऊ देणार नाही”, असे अख्तर म्हणाला.
हार्दिकनंतर आता ‘या’ खेळाडूचा नंबर? प्रेयसीसोबतच्या फोटोनंतर चर्चांना उधाण
ICC ने या निर्णयाबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. पण कसोटी सामना चार दिवसांचा करण्याच्या नियमाची अंमलबजावणी २०२३ पासून होण्याची शक्यता आहे. २०२३ ते २०३१ या कालावधीत होणाऱ्या कसोटी सामन्यांसाठी हा नियम राबवला जाण्याची शक्यता आहे. पण याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. याबाबत विचारविनिमय सुरु असून तज्ज्ञांकडून मत मागवली जात आहेत.