Shoaib Akhtar On Champions trophy 2025 And BJP: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ सध्या मोठा चर्चेचा विषय आहे. पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद भूषवणार आहे. त्यामुळे भारतीय संघ या आयसीसी स्पर्धेसाठी पाकिस्तानात जाण्यासाठी तयार नाही, याबाबत पाकिस्तानचे माजी खेळाडू अनेक वक्तव्य करत आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीदेखील आशिया कप २०२३ प्रमाणे हायब्रिड मॉडेलमध्ये खेळवली जाईल अशी चिन्हे आहेत. दरम्यान, पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने मोठे विधान केले आहे.

एका टीव्ही चॅनेलवरील मुलाखतीत शोएब अख्तरने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ पाकिस्तानात येण्याबाबत केलेल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. “टीम इंडियाचे पाकिस्तानात येणे बीसीसीआयवर अवलंबून नसून भाजप सरकारवर अवलंबून असेल, असे अख्तरने म्हटले आहे. शोएब म्हणाला, “हा निर्णय सरकारवर अवलंबून आहे. त्याचा बीसीसीआयशी काहीही संबंध नाही. हा निर्णय पूर्णपण भाजप सरकारवर अवलंबून आहे, ते ठरवतील.”

George Linde Misses Team Bus But leads South Africa to Thrilling Win by Career Best All Rounder Performance SA vs PAK
PAK vs SA: आधी टीम बस चुकली, नंतर पोलिसांच्या गाडीतून पोहोचला मैदानात अन् पाकिस्तानला नमवत जिंकला सामनावीराचा पुरस्कार
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Shaheen Shah Afridi becomes youngest bowler to complete 100 wickets in all 3 formats
Shaheen Afridi: शाहीन शाह आफ्रिदीचा मोठा पराक्रम, क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा सर्वात तरूण गोलंदाज
IND vs AUS Travis Head Reveals Discussion with Mohammed Siraj About Their Fight in 2nd test Watch Video
VIDEO: सिराज आणि हेडमध्ये नेमकं काय बोलणं झालं? सिराजने भांडण मिटवलं का? त्यावर हेड काय म्हणाला?
Rohit Sharma on Mohammed Shami Fitness and Comeback in Team for last 3 Test Against Australia
IND vs AUS: मोहम्मद शमीच्या पुनरागमनाबद्दल रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, दुसऱ्या कसोटी पराभवानंतर नेमकं काय म्हणाला?
Rohit Sharma Statement on Mohammed Siraj and Travis Head Fight in IND vs AUS 2nd Test
IND vs AUS: “मर्यादा ओलांडायला नको…”, रोहित शर्माने सिराज-हेडच्या वादात भारतीय गोलंदाजाची घेतली बाजू, सामन्यानंतर केलं मोठं वक्तव्य
Mohammed Siraj Statement on Travis Head Sendoff Incident Said Its a lie that he said well bowled to me
Siraj on Travis Head Fight: “हेडने सांगितलं ते खोटं आहे…”, मोहम्मद सिराजचं ट्रॅव्हिस हेडच्या वादावर मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाला?
Travis Head Statement on Mohammed Siraj Fight and Send Off Said I Said Well Bowled IND vs AUS 2nd Test
Travis Head on Siraj Fight: “मी म्हणालो चांगला चेंडू होता पण त्याने…”, सिराज आणि हेडमध्ये नेमका कशावरून झाला वाद? ट्रॅव्हिस हेडने सामन्यानंतर सांगितलं

हेही वाचा – IND vs AUS: भारतीय संघ पर्थ कसोटीत फिरकीपटू म्हणून फक्त अश्विनलाच देणार संधी, काय आहे कारण?

पुढे पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज म्हणाला, “पडद्यामागे याबाबत चर्चा होईल. युद्धाच्या काळातही पडद्याआड चर्चा होत असतात. भारत पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी येईल याची आशा आपण सोडली नाही पाहिजे. आपल्याला यावर उपाय शोधावा लागणार आहे. आयसीसीला ९५-९८ टक्के स्पॉन्सरशिप ही भारतातून येते हे आपल्याला माहित आहे.”

हेही वाचा – IND vs SA T20 मालिकेनंतर ICC ने ‘या’ खेळाडूला दिली शिक्षा, पण नेमकं कारण तरी काय?

“जर पाकिस्तान भारताला पाकिस्तानात येण्यासाठी तयार कऊ शकला नाही, तर दोन गोष्टी घडतील. आम्ही १०० मिलियन डॉलरची स्पॉन्सरशिप गमावून बसू, जी आयसीसीकडे जाणार आहे आणि यजमान देशाला मिळणार आहे. दुसरी, भारत पाकिस्तानात येऊन खेळला तर हे चांगलं होईल, परंतु हा निर्णय पूर्णपणे सरकारवर अवलंबून आहे, त्याचा बीसीसीआयशी काहीही संबंध नाही,” असं अख्तर म्हणाला.

विराट कोहलीबाबत बोलताना शोएब अख्तर म्हणाला, “विराट कोहली प्रथमच पाकिस्तानत खेळू शकतो. संपूर्ण पाकिस्तान देश विराट कोहलीला त्यांच्या देशात खेळताना पाहू इच्छित आहे. पाकिस्तानच्या मैदानावर खेळताना विराट कोहलीला शतक झळकावताना पाहणं काय किती छान असेल. त्याने इथे एकही शतक केले नाहीय तो लवकर आऊट झाला आहे.”

हेही वाचा – Border Gavaskar Trophy 2024 Schedule: भारतीय वेळेनुसार बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचं कसं असणार वेळापत्रक? पहाटे किती वाजता सुरू होणार सामना?

यजमान पाकिस्तानबाबत बोलताना अख्तर म्हणाला, “पाकिस्तानवर असा टॅग आहे की, तो विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसारख्या मोठ्या स्पर्धांचे आयोजन करू शकत नाही. पण जर चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानत खेळवली गेली तर ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट ठरेल. आम्हाला आशा आहे. आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहत आहोत. तुम्ही मला आता विचाराल तर मी म्हणेन की भारतीय संघ येत आहे.”

Story img Loader