रोहित शर्माने केलेल्या नाबाद शतकाच्या जोरावर भारताने तिसऱ्या टी-२० सामन्यात विजय मिळवत, ३ सामन्यांची मालिका २-१ ने जिंकली. इंग्लंडच्या संघाने दिलेलं १९९ धावांचं आव्हान भारताने सहज पूर्ण केलं. या विजयानंतर पाकिस्तानचा माजी गोलंदाज रावळपिंडी एक्स्प्रेस शोएब अख्तरने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन भारतीय संघाचं कौतुक केलं.

मात्र भारतीय संघाचं कौतुक करणं शोएब अख्तरला चांगलचं महागात पडलं. त्याच्या या ट्विटवरं पाकिस्तानी चाहत्यांनी शोएबला चांगलंच ट्रोल केलं.

अनेक चाहत्यांनी शोएब अख्तरला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम सामन्यात आक्रमक अर्धशतकी खेळी करणाऱ्या फखार झमानचा उल्लेख का केला नाहीस असा सवालही केला.

Story img Loader