IND vs AUS Match Update Shoaib Akhtar Post: ऑस्ट्रेलियाने भारताच्या स्वप्नांचा भंग करत मिळवलेल्या विजयासह सहाव्यांदा विश्वविजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत २४० धावा केल्या होत्या. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात हे लक्ष्य तुलनेने खूपच कमी होते पण भारताच्या भेदक गोलंदाजांचा यंदाचा फॉर्म पाहता संपूर्ण भारत तरीही आशावादी होता. पण दुर्दैवाने केवळ चार विकेट घेता आल्याने भारताला सहा विकेट्सच्या फरकाने निराशाजनक पराभव पत्करावा लागला. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने ४३ षटकात ४ विकेट गमावत २४१ धावा करुन सामना जिंकला आहे. ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने खोचक पोस्ट केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शोएब अख्तरने महिन्याभराच्या पूर्वी केलेल्या स्वतःच्या एका पोस्टचा पुन्हा संदर्भ देत घ्या मी तर तुम्हाला एक महिना आधीच सांगितलं होत असं म्हटलं आहे. अख्तरच्या जुन्या पोस्टमध्ये असे लिहिले होते की जर आज ऑस्ट्रेलिया जिंकली नाही तर संपूर्ण स्पर्धेत सगळ्यांवर राग काढू शकतात. १२ ऑक्टोबर २०२३ ला शोएब अख्तर याने ही पोस्ट दक्षिण आफ्रिका विरूद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याच्या वेळी केली होती. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ ३११ धावांच्या आव्हानचा पाठलाग करताना अवघ्या ४० षटकांमध्ये सर्वबाद झाला होता. याचा बदला ऑस्ट्रेलिया विश्वचषकाच्या दरम्यान बाकीच्या संघांशी खेळताना घेणार असे शोएब अख्तरला मस्करीत सुचवायचे होते.

शोएब अख्तर पोस्ट

हे ही वाचा<< ऑस्ट्रेलियाचा संघ विजय साजरा करताना ‘हा’ क्षण पाहून डोळे पाणवतील! मोहम्मद सिराजने शेवटचा बॉल टाकला आणि..

दरम्यान, ही आताची पोस्ट भारतीय चाहत्यांना अजिबातच आवडलेली दिसत नाही. कमेंट बॉक्समध्ये अनेकांनी तुम्ही तर तुलना करूच नका, पाकिस्तानला तर केव्हाच घरी पाठवलं आहे असं म्हणत अख्तरलाच सुनावलं आहे. टीम इंडियाच्या पराभवांनंतर प्रतिक्रिया देताना रोहित शर्माने सुद्धा आज आमचा दिवस नव्हता असे म्हणत खंत व्यक्त केली आहे. आजच्या सामन्याचा अपवाद वगळल्यास भारतीय संघ या संपूर्ण मोहिमेतील सर्वात यशस्वी संघ सिद्ध झाला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shoaib akhtar trying funny post as india lost says i told month ago angry australia will take revenge indian fans befitting reply svs