पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने ट्विटद्वारे आपल्या चाहत्यांना त्याचा ड्रीम प्रोजेक्ट अयशस्वी झाल्याची माहिती दिली. अख्तरने खुलासा केला की “रावळपिंडी एक्स्प्रेस” नावाचा बायोपिक त्याच्या जीवनावर बनवला जात होता, परंतु त्याने आता यामध्ये सामील टीमशी असलेले संबंध तोडले आहेत. या प्रकल्पातून माघार का घेत आहे, यामागचे कारणही त्यानी सांगितले आहे. त्याने निर्मात्यांना धमकीही दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

४७ वर्षीय शोएब म्हणाला की तो बायोपिक बनवू इच्छित होता, परंतु चित्रपट निर्मात्यांनी कराराचा भंग केला आणि काही मतभेदांमुळे करार रद्द केला. अख्तरने पुढे जाहीर केले की निर्मात्यांनी चित्रपट बनवणे सुरूच ठेवले आणि त्याचे नाव किंवा जीवनातील प्रसंग कोणत्याही प्रकारे वापरले तर तो कायदेशीर मार्ग स्वीकारेल.

शोएब अख्तरने ट्विट केले की, “अत्यंत दु:खाने, मी तुम्हा सर्वांना कळवू इच्छितो की, खूप विचार करून आणि समजून घेतल्यानंतर, मी ‘रावळपिंडी एक्स्प्रेस’ चित्रपटासोबत माझ्या व्यवस्थापन आणि कायदेशीर टीमद्वारे करार रद्द केला आहे. तसेच निर्मात्यांपासून स्वत: ला वेगळे करण्याचा निर्णय घेतला आहे. निश्चितपणे, हा एक ड्रीम प्रोजेक्ट होता.”

अख्तरने पुढे लिहले, ”मला हा बायोपिक करायचा होता आणि करार टिकवून ठेवण्याचा खूप प्रयत्न केला, पण दुर्दैवाने, काही गोष्टी व्यवस्थित होत नव्हत्या.” निर्मात्यांनी त्याचा बायोपिक चित्रपट बनवत राहिल्यास आणि त्याचे नाव किंवा जीवनातील प्रसंग कोणत्याही प्रकारे वापरल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही त्याने लिहिले आहे.

हेही वाचा – Smoothman Gill: सुनील गावसकरांनी नवीन टोपणनाव दिल्यानंतर शुबमनची आली प्रतिक्रिया; म्हणाला, ‘मला…’

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील रावळपिंडी शहराचा राहणारा, अख्तरला रावळपिंडी एक्स्प्रेस म्हणूनही ओळखले जाते. जे क्रिकेट बिरादरी आणि चाहत्यांनी त्याच्या कारकिर्दीत क्रिकेटमधील सर्वात वेगवान गोलंदाजांपैकी एक म्हणून दिलेले नाव आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विश्वविक्रम अजूनही निवृत्त क्रिकेटपटूच्या नावावर आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shoaib akhtar withdraws from his biopic rawalpindi express and threatens the makers vbm