Shoaib Malik Match Fixing in BPL 2024 : पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू शोएब मलिक सध्या चर्चेत आहे. टेनिसपटू सानिया मिर्झाशी घटस्फोट आणि त्यानंतर तिसरं लग्न यामुळे तो चर्चेत असतानाच त्याच्यावर आता मॅच फिक्सिंगचे आरोप होत आहेत. बांगलादेश प्रीमियर लीगच्या सामन्यामधील त्याच्या एका कृतीमुळे मलिकवर मॅच फिक्सिंगचे आरोप होत आहेत. बीपीएलच्या एका सामन्यात एकाच षटकात त्याने सलग तीन नो-बॉल टाकले होते. फॉर्च्युन बरिशलकडून खेळताना त्याने खुलना टायगर्सविरुद्ध हे लज्जास्पद षटक टाकलं होतं. या षटकात त्याने एकूण १८ धावा दिल्या. मलिकच्या या गोलंदाजीमुळे तो समाजमाध्यमांवर ट्रोल झाला. पाठोपाठ आता त्याच्यावर मॅच फिक्सिंगचे आरोप होत आहेत.
मॅच फिक्सिंगच्या आरोपांदरम्यान, फॉर्च्युन बरिशलच्या (Fortune Barishal) संघव्यवस्थापनाने शोएब मलिकबरोबरचं कॉन्ट्रॅक्ट रद्द केलं आहे. तसेच बीपीएलकडून शोएब मलिकच्या मॅच फिक्सिंग प्रकरणाचा तपास केला जाणार आहे. शोएब मलिकने मॅच फिक्स केली होती, ही बाब तपासांत सिद्ध झाली तर मलिकवर मोठी कारवाई होऊ शकते. तसेच त्याला शिक्षा भोगावी लागू शकते. यासह त्याच्या बीपीएलमध्ये खेळण्यावर बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. बीपीएलच्या कारवाईनंतर शोएब मलिक इतर क्रिकेट लीग्समध्येदेखील खेळू शकणार नाही.
शोएब मलिक बीपीएलमध्ये फॉर्च्यून बरिशलकडून खेळत होता. तमीम इक्बाल या संघाचा कर्णधार आहे. बीपीएलमधील फॉर्च्यून बरिशल विरुद्ध खुलना टायगर्स या साम्यात बरिशलने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद १८७ धावांपर्यंत मजल मारली होती. मुश्फिकूर रहीमच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर बरिशल सुस्थितीत होती. त्यानंतर खुलना टायगर्स धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरली. त्याचवेळी पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करताना कर्णधार तमीमने चेंडू शोएब मलिकच्या हाती सोपवला. शोएबने या षटकात तीन बॉलसह तब्बल १८ धावा दिल्या.
४१ वर्षीय शोएब मलिकने या सामन्यात चौथ्या षटकात तीन नो बॉल टाकले. या षटकातील पहिल्या ५ चेंडूंवर त्याने एका नो बॉलसह केवळ ६ धावा दिल्या होत्या. परंतु, नंतर एका चेंडूच्या बदल्यात त्याने दोन नो बॉल टाकले. ज्यामध्ये एक नो बॉल, एका नो बॉलवर फलंदाजाने चौकार वसूल केला. तर अखेरच्या चेंडूवर (फ्री हिट) फलंदाजाने षटकार लगावला. १८७ धावा करूनही या सामन्यात बरिशल पराभूत झाली. खुलना टायगर्स संघाने अवघ्या १८ षटकांत दोन गड्यांच्या बदल्यात हे लक्ष्य पार केलं.
या सामन्यात खुलना टायगर्सकडून एव्हिन लुईसने ५ षटकारांच्या मदतीने अवघ्या २२ चेंडूत ५३ धावा फटकावल्या. तर अफीक हुसैनने ३६ चेंडूत ४१ धावांची खेळी केली. अनामुल हकने ४४ चेंडूत ६३ धावांची खेळी केली. अनामुलला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
शोएब मलिकची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द
- ३५ कसोटी सामने – १९९८ धावा, ३२ बळी
- २८७ एकदिवसीय सामने – ७५३४ धावा, १५८ बळी
- १२४ टी-२० सामने – २४३५ धावा, २८ बळी