भारताची दिग्गज टेनिसपटू सानिया मिर्झा व तिचा पती पाकिस्तानचा स्टार क्रिकेटर शोएब मलिक यांच्यात अनेक दिवसांपासून मतभेद असल्याच्या चर्चा सुरू आहेत. दोघे लवकरच एकमेकांपासून वेगळे होऊ शकतात, असा दावा अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे. सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांनी २०१३ मध्ये लग्न केले होते. दोघांना एक मुलगा देखील आहे, त्याचे नाव इझान मिर्झा मलिक आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीस शोएब आणि सानियाच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. दोघांनी याबद्दल कोणतंही वक्तव्य केलं नव्हतं, पण आता बऱ्याच महिन्यांनी शोएबने या चर्चांवर मौन सोडलं आहे.

Arijit Singh Love Story: वर्षभरात घटस्फोट, एका मुलाची आई असलेल्या मैत्रिणीशी दुसरं लग्न अन्… जाणून घ्या अरिजीतच्या पत्नीबद्दल

Image Of Supriya Sule And Ajit Pawar
Supriya Sule : “मी बोलते, पण अजित पवार माझ्याशी…”, पवार कुटुंबीयांतील दुराव्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Woman dies by suicide, family alleges harassment by husband over English skills
“इंग्रजी बोलता येत नाही, नवऱ्याला शोभत नाहीस”, सासरच्या छळाला कंटाळली; विवाहितेचा घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
hasan mushrif ajit pawar (1)
“…तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत”, हसन मुश्रीफांचं वक्तव्य
siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
aamir khan kiran rao
“त्याची आई अजूनही…”, किरण रावचं आमिर खानच्या कुटुंबाबद्दल भाष्य; त्याच्या मुलांची नावं घेत म्हणाली…
लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूआधी ताश्कंदमध्ये नेमकं काय घडलं होतं? (फोटो सौजन्य इंडियन एक्स्प्रेस)
Lal Bahadur Shastri Death : लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूआधी ताश्कंदमध्ये नेमकं काय घडलं होतं?
Devendra Fadnavis and Sharad Pawar (1)
Sharad Pawar : बीडप्रकरणी शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन; म्हणाले, “राजकारणात मतभेद असतील-नसतील, पण…”

एका पाकिस्तानी टीव्ही चॅनलशी संवाद साधताना शोएब मलिकला त्याच्या व सानियाच्या नात्याबद्दल सुरू असलेल्या चर्चांबाबत विचारण्यात आले. यावर शोएब मलिक म्हणाला, ”मला यावर काहीही बोलायचं नाही. मी सांगू इच्छितो की ईदच्या दिवशी आम्ही एकत्र असतो तर खूप छान झालं असतं. पण सानियाला आयपीएलमध्ये काम करायचं आहे. ती आयपीएलमध्ये शो करतेय, म्हणूनच या ईदला आम्ही एकत्र नाही. आम्ही नेहमीप्रमाणे एकमेकांवर प्रेम करतो. मला तिची खूप आठवण येते, एवढंच मी म्हणू शकतो. प्रत्येकाला आपलं काम करावं लागतं, पण ईद असा दिवस असतो जेव्हा तुम्हाला तुमच्या जवळच्या लोकांची आठवण येते.”

“बाळाच्या जन्मानंतर तिला आत्महत्या करायची होती, कारण…”; प्रसिद्ध अभिनेत्रीबद्दल मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा

शोएब पुढे म्हणाला, “आम्ही दोघेही अशा अफवांवर लक्ष देत नाही. यावर मी किंवा सानिया दोघांपैकी कोणीही कोणतंही निवेदन प्रसिद्ध केलेल नाही.” दरम्यान, दोघांच्या नात्याबाबत सुरू असलेल्या चर्चांवर आतापर्यंत शोएब किंवा सानियाने कोणतंही भाष्य केलं नव्हतं. पण, आता शोएबने त्या चर्चा केवळ अफवा असल्याचं म्हटलंय. तर, दुसरीकडे सानियाने याबद्दल काहीच वक्तव्य केलेलं नाही.

Story img Loader