आगामी टी-२० विश्वचषकासाठी पाकिस्तान संघाने अजून एक बदल केला आहे. पाकिस्तानने अनुभवी क्रिकेटपटू आणि भारताचा जावई शोएब मलिकचा संघात समावेश करण्याची घोषणा केली. पाठीच्या दुखापतीतून सावरण्यात अपयशी ठरलेल्या सोहेब मकसूदच्या जागी शोएब मलिकचा समावेश करण्यात आला आहे. एमआरआय स्कॅननंतर असे आढळून आले की या दुखापतीतून बरे होण्यासाठी मकसूदला अधिक वेळ लागेल.

मकसूदचा यापूर्वी १५ सदस्यीय मुख्य संघात समावेश होता. लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर राष्ट्रीय टी-२० चषकाच्या सामन्यादरम्यान तो जखमी झाला होता. “सोहेबचे विश्वचषकातून बाहेर पडणे निराशाजनक आहे, कारण त्याने त्यासाठी कठोर परिश्रम केले होते आणि तो उत्तम फॉर्मात होता”, असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) सांगितले.

Tilak Varma at 3rd Spot in ICC T20I Batting Rankings overtakes Suryakumar Yadav to become Indias highest ranked T20I batter
ICC T20 Rankings: दोन शतकांसह तिलक वर्माची आयसीसी क्रमवारीत जोरदार मुसंडी; कर्णधार सूर्यकुमार यादवलाही टाकलं मागे
Hardik Pandya No 1 T20I All Rounder Reclaims First Spot After Win vs South Africa in ICC Rankings
ICC Ranking: हार्दिक पंड्या ‘नंबर वन’ टी-२० अष्टपैलू…
Shubman Gill Injury Update Given By India Bowling Coach Morne Morkel IND vs AUS 1st Test
IND vs AUS: शुबमन गिलच्या दुखापतीबाबत कोचचे मोठे अपडेट, फ्रॅक्चर असतानाही पहिली कसोटी खेळणार?
Shoaib Akhtar Statement on BJP and BCCI Over India Travel To Pakistan for Champions Trophy
Champions Trophy: “BCCI नव्हे, भाजपा…”, भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला न येण्यावरून शोएब अख्तरचं मोठं वक्तव्य
South Africa pacer Coetzee fined by ICC and handed demerit point for inappropriate comment On Umpire in IND vs SA 4th T20I
IND vs SA T20 मालिकेनंतर ICC ने ‘या’ खेळाडूला दिली शिक्षा, पण नेमकं कारण तरी काय?
IND vs AUS R Ashwin set for Perth Test selection in lone spinner role Border Gavaskar Trophy
IND vs AUS: भारतीय संघ पर्थ कसोटीत फिरकीपटू म्हणून फक्त अश्विनलाच देणार संधी, काय आहे कारण?
Mohammad Kaif Says Ricky Ponting did not want Shikhar Dhawan
Mohammad Kaif : सौरव गांगुलीने ‘या’ खेळाडूसाठी पॉन्टिंगशी घातला होता वाद, मोहम्मद कैफचा मोठा खुलासा
Rishabh Pant breaks silence on leaving Delhi Capitals after Sunil Gavaskar statement about Delhi Capitals ahead IPL 2025
Rishabh Pant : ‘पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सला सोडलं नाही…’, IPL 2025 च्या महालिलावापूर्वी ऋषभ पंतच्या पोस्टने खळबळ
IPL 2025 Mega Auction List of most expensive players in each IPL season's auction
IPL 2025 : धोनीपासून ते मिचेल स्टार्कपर्यंत… प्रत्येक हंगामात कोणता खेळाडू ठरला होता सर्वात महागडा? पाहा संपूर्ण यादी

मंडळाने म्हटले, ”संघ व्यवस्थापनाशी बोलल्यानंतर आम्ही शोएब मलिकला त्याच्या जागी संघात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला खात्री आहे की शोएबचा अनुभव संपूर्ण संघाला उपयोगी पडेल. शोएब मलिक २००७ मध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या हंगामात संघाचा कर्णधार होता आणि २००९ मध्ये चॅम्पियन बनलेल्या संघाचा सदस्य होता. तो २०१२, २०१४ आणि २०१६ हंगामातही खेळला आहे.

हेही वाचा – IPL 2022 : डेव्हिड वॉर्नरबाबत ‘मोठा’ खुलासा! मेगा ऑक्शनपूर्वी महत्त्वाची माहिती आली समोर

पाकिस्तान संघात समाविष्ट खेळाडू

बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हरीस रौफ, हसन अली, इमाद वसीम, मोहम्मद हफीज, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), मोहम्मद वसीम जूनियर, सरफराज अहमद (यष्टीरक्षक), शाहीन शाह आफ्रिदी आणि शोएब मलिक

राखीव खेळाडू – खुशदील शहा, शाहनवाज दहानी आणि उस्मान कादिर