Shoaib Malik is getting trolled on social media : पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शोएब मलिकने बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये एकाच षटकात तीन नो-बॉल टाकले. फॉर्च्युन बरीशालकडून खेळताना त्याने खुलना टायगर्सविरुद्ध हे लज्जास्पद षटक टाकले. या षटकात त्याने एकूण १८ धावा दिल्या. आता मलिकच्या या गोलंदाजीवर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. त्याच्यावर अनेक मीम्स बनवले जात आहेत.

शोएब मलिकने गेल्या आठवड्यातच तिसरे लग्न केले. आयशा सिद्दीकी आणि भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा यांच्याशी लग्न केले होते. त्याने आता पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी लग्न केले आहे. शोएब मलिक तिसरे लग्न झाल्यापासून खूप चर्चित आगे आतापर्यंत सोशल मीडिया यूजर्स त्याच्या तिसऱ्या लग्नाबद्दल मीम्स बनवत होते, आता शोएब मलिकने त्यांना आणखी एक संधी दिली आहे.

बांगलादेश प्रीमियर लीगमधील या तीन नो-बॉलमुळे शोएब मलिकची खूप मजा घेतली जात आहे. काही सोशल मीडिया युजर्स त्याच्या गोलंदाजीची तुलना मोहम्मद आमिरशी करत आहेत, तर काही जण त्याला फिक्सर म्हणत आहेत. त्याचबरोबर काही युजर्स तर असे लिहित आहेत की, ‘लग्न असो किंवा नो-बॉल, तो सर्वकाही तीनदा करतो.’

हेही वाचा – Glenn Maxwell : पब पार्टीत मॅक्सवेलची तब्येत बिघडल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सुरू केला तपास

२०१० साली झाला होता दुसरा विवाह –

भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा ही शोएब मलिकची दुसरी पत्नी होती. १२ एप्रिल २०१० रोजी हैदराबाद येथे या दोघांचा विवाह संपन्न झाला होता. त्यानंतर ऑक्टोबर २०१८ साली दोघे इझहानचे पालक झाले. मागच्या काही वर्षांपासून या दोघांच्या वैवाहिक आयुष्यात अडचणी असल्याचे बोलले जात होते. मात्र त्याबद्दल दोघांनीही जाहीर वाच्यता केली नाही किंवा नात्यामधील तणाव बाहेर दाखवला नव्हता. त्यानंतर थेट शनिवारी शोएब मलिकच्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे त्यांच्या चाहत्याना याची बातमी कळली.

Story img Loader