पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. इंग्लंडविरुद्ध शारजाह येथे सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात अपयश आल्यानंतर त्याने हा निर्णय जाहीर केला.
पाच वर्षांनंतर मलिकने कसोटीत पुनरागमन केले होते. इंग्लंडविरुद्ध अबुधाबी येथे झालेल्या पहिल्या कसोटीत २४५ धावांची खेळी त्याने साकारली. मात्र, त्यानंतर त्याला पाच डावांमध्ये केवळ ४७ धावा करता आल्या. निवृत्तीबाबत तो म्हणाला की, ‘‘इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीनंतर मी निवृत्ती घेणार आहे. हा निर्णय समाधानकारक कामगिरी होत नसल्यामुळे घेतलेला नाही. कुटुंबाला अधिक वेळ देता यावा आणि २०१९च्या विश्वचषक स्पध्रेवर लक्ष केंद्रित करता यावे, म्हणून निवृत्ती घेत आहे.’’
२००१मध्ये मुलतान येथे बांगलादेशविरुद्ध मलिकने कसोटीत पदार्पण केले होते. त्याने कारकिर्दीत ३५ कसोटी सामन्यांत १८९८ धावा केल्या असून त्यात तीन शतके व आठ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच्या नावावर २९ बळीही आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा