ख्रिसमसचा सण नुकताच साजरा करण्यात आला. या सणाचे औचित्य साधून पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक याने त्याच्या चाहत्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छा देताना शोएब मलिकने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्यासोबत एक फोटो ट्विट केला. या फोटोत त्याने धोनीची टिंगल करण्याचा प्रयत्न केला. पण त्या फोटोवरून भारतीयांनी शोएब मलिकला भरभरून ट्रोल केले.

शोएब मलिकने ट्विट केलेला फोटो –

पाकिस्तानने २०१२ साली भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या टी २० सामन्याचा फोटो दाखवला. त्या सामन्यात पाकिस्तानने ५ गडी राखून विजय मिळवला. तोच फोटो त्याने ट्विट केला. त्या फोटोत मलिक धोनीला चिडवताना दिसत होता. त्या फोटोवर त्याने “मेरी ख्रिसमिस मित्रांनो आणि २५ डिसेंबरच्या शुभेच्छा” असे कॅप्शन टाकले.

दरम्यान, नेटिझन्सने शोएब मलिकला तुफान ट्रोल केले.

Story img Loader