Shoaib Malik’s extramarital affairs : शनिवारी, २० जानेवारी रोजी, पाकिस्तानचा माजी क्रिकेटर अष्टपैलू शोएब मलिकने अभिनेत्री सना जावेदशी लग्न केल्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. अशा प्रकारे त्याने आपला नवीन जीवन साथीदार निवडल्याचे स्पष्ट केले. शोएबच्या या निर्णयामुळे सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. पाकिस्तानी मीडियानुसार, शोएबच्या कुटुंबातील एकही सदस्य या लग्नाला उपस्थित नव्हता. याशिवाय सानिया मिर्झाने शोएब मलिकपासून वेगळे होण्याचा निर्णय का घेतला हेही या अहवालाद्वारे समोर आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मलिकच्या विवाहबाह्य संबंधांमुळे सानिया होती त्रस्त –

पाकिस्तानी मीडियानुसार, शोएब मलिकच्या विवाहबाह्य संबंधांमुळे सानिया मिर्झा नाराज होती. याला शोएब मलिकच्या बहिणींनी दुजोरा दिला आहे. या दोघांच्या घटस्फोटाच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत होत्या. मात्र, अद्याप दोघांनीही याला दुजोरा दिलेला नाही. आतापर्यंत दोघे घटस्फोटाच्या बातम्यांचे खंडन करत होते, मात्र शोएब मलिकच्या तिसऱ्या लग्नावरून आता त्यांचे नाते तुटल्याचे स्पष्ट झाले आहे.

सानिया मिर्झाने शोएबकडून घेतला ‘खुला’ –

शोएब मलिकच्या लग्नानंतर भारताची माजी टेनिस स्टार सानिया मिर्झाच्या वडिलांनीही पुष्टी केली की, आता सानियाने शोएबकडून ‘खुला’ घेतला आहे. ‘खुला’ अंतर्गत पत्नी पतीच्या परवानगीशिवाय घटस्फोट घेऊ शकते. शोएब आणि सानियाचे लग्न २०१० मध्ये हैदराबादमध्ये झाले होते. तसेच दोघेही २०१८ मध्ये पालक झाले. त्यांना पाच वर्षांचा इझहान नावाचा मुलगा आहे. ते दोघेही दुबईत राहत होते.

हेही वाचा – Shahneel Gill : सारा तेंडुलकरबरोबर दिसली शुबमन गिलची बहीण, कॅमेरा बघून लपवला चेहरा; पाहा VIDEO

शोएबने दुसरे लग्न सानियाशी केले होते –

शोएबचे दुसरे लग्न सानियाशी झाले होते. याआधी त्याने आयशा सिद्दीकीबरोबर लग्न केले होते. त्याचवेळी, सना जावेदसह शोएबचे हे तिसरे लग्न आहे. सना ही पाकिस्तानी अभिनेत्री आहे. तिने अनेक टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. सनाचाही घटस्फोट झाला असून तिचे हे दुसरे लग्न आहे. यापूर्वी सनाने २०२० मध्ये पाकिस्तानी गायक उमेर जसवालसोबत लग्न केले होते. मात्र, अवघ्या दोन महिन्यांतच त्यांचा घटस्फोट झाला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shoaib maliks sisters revealed that sania mirza khula shoaib for having an extramarital affair vbm