भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी निवड प्रक्रियेबाबत मोठा खुलासा केला आहे. निवड बैठकीला काही लोक उपस्थित होते ज्यांची अजिबात गरज नव्हती असे शास्त्री यांचे मत आहे. रवी शास्त्री यांची २०१४ साली टीम इंडियासाठी आधी मेंटॉर आणि नंतर मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. यानंतर तो सात वर्षे टीम इंडियासोबत होता. २०२१च्या विश्वचषकानंतर शास्त्री यांचा कार्यकाळ संपत आहे. मात्र, त्यांच्या कार्यकाळात टीम इंडियाला एकदाही आयसीसीचे जेतेपद पटकावता आले नाही.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांचा कार्यकाळ वादांनी भरलेला होता. विशेषत: २०२१चे वर्ष जेव्हा टीम इंडियामध्ये संक्रमणाचा टप्पा सुरू होता. विराट कोहलीच्या कर्णधारपदाचे युग संपुष्टात येत होते आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांची सत्ताही संपुष्टात येत होती. हीच वेळ होती जेव्हा विराट कोहलीने टी२० संघाचे कर्णधारपद सोडले होते. त्याला वन डे संघाच्या कर्णधारपदावरून वगळण्यात आले. त्यानंतर विराट आणि गांगुली वाद चव्हाट्यावर आला जो सध्याच्या आयपीएल २०२३ मध्येही चर्चेत होता. त्यादरम्यान, निवड बैठकीला सौरव गांगुली स्वत: उपस्थित होता का, असा प्रश्नही माध्यमांमध्ये उपस्थित करण्यात आला होता. याचा एक फोटोही व्हायरल झाला होता. मात्र तत्कालीन बोर्ड अध्यक्षांनी तो फेटाळून लावला.

हेही वाचा: IPL 2023: आयपीएल २०२३ मधून रोहित शर्मा घेणार ब्रेक? मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकाचे सूचक विधान, गावसकरांनाही दिले उत्तर

आता पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेला येऊ शकतो. टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी असे विधान केले आहे की त्यामुळे भारतीय क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा वादाला तोंड फुटू शकते. शास्त्री प्रशिक्षक असताना त्यादरम्यान होणाऱ्या संघाच्या निवड बैठकीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या बैठकांना जे लोक उपस्थित होते त्यांनी हा घोटाळा केला आहे कारण, त्यांची उपस्थिती नियमानुसार नको होती. शास्त्री यांनी कोणाचेही नाव घेतले नसले तरी बैठकीदरम्यान काही लोक उपस्थित होते, जे तेथे नसावेत, असे संकेत त्यांनी दिले. निवड प्रक्रियेत आपला कोणताही हस्तक्षेप नसल्याचाही त्यांनी इन्कार केला.

रवी शास्त्रींच्या वक्तव्यामुळे नवीन वादाला तोंड फुटू शकते

याविषयी विचारले असता रवी शास्त्री यांनी ईएसपीएन क्रिकइन्फोला सांगितले की, “मला याबाबतचा अनुभव शून्य आहे. मी सात वर्षे संघासोबत राहिलो पण निवड समितीच्या बैठकीत कधीही फिरकलो नाही. मला निमंत्रणही दिले गेले नाही किंवा मला नियमानुसार जाऊ दिले गेले नाही. प्रशिक्षक म्हणून तुम्ही बहुतांश वेळा खेळाडूंसोबत असता. तुम्ही या मीटिंगमध्ये सहभागी होऊ शकत नाही, पण किमान निवडकर्त्यांचे मत जाणून घेऊ शकता. त्यानंतर संघासाठी जे योग्य असेल ते केले पाहिजे. पण ती बैठक कधी सुरू होते आणि कधी संपते याची मला अजिबात कल्पना नव्हती. मला जे कळले त्यानुसार जे लोक निवड समितीच्या बैठकीला ३-४ वर्षांपासून उपस्थित नसावेत. ते नियमांच्या विरोधात होते, नको त्या लोकांना निवड समितीमध्ये बीसीसीआय बोलावत होती.”

हेही वाचा: WTC Final: एम. एस. धोनी WTC फायनलसाठी टीम इंडियामध्ये परतणार? रवी शास्त्रींचे मोठे विधान

बीसीसीआयच्या घटनेत काय म्हटले आहे?

रवी शास्त्रीच्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा तो जुना मुद्दा चर्चेला आला आहे, त्यानुसार सौरव गांगुली निवड समितीच्या बैठकीत उपस्थित असायचा. गेल्या वर्षी ऋद्धिमन साहाच्या निवड वादातही हा मुद्दा चर्चेत आला होता. काही निवडकर्त्यांनीही गांगुली निवड बैठकीत ढवळाढवळ करत असल्याची पुष्टी केली. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये सौरव गांगुली माजी मुख्य निवडकर्ता एम.एसके. प्रसाद, तत्कालीन कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मासोबत बसलेला दिसत होता. हा फोटो निवड बैठकीचा नाही, असे गांगुलीने मीडियाला स्पष्टपणे सांगितले होते. बीसीसीआयच्या घटनेबद्दल बोलायचे झाले तर राष्ट्रीय संघाच्या निवडीत अध्यक्षांचा कोणताही हस्तक्षेप नसावा. सर्वोच्च न्यायालयानेही या घटनेला मान्यता दिली आहे. त्यानुसार सभेला उपस्थित राहण्याचा अधिकार फक्त मंडळाच्या सचिवांना आहे आणि तोही निवड प्रक्रियेत कोणताही हस्तक्षेप न करता केवळ निमंत्रक म्हणून.

Story img Loader