Shoiab Akhtar Slams Babar Azam: आशिया चषकमधील पाकिस्तानचा दारुण पराभव पाहता पाकिस्तानचे माजी खेळाडू विद्यमान टीमवर निशाणा साधत आहेत. शाहीद आफ्रिदी, वसीम अक्रम यांच्यानंतर आता माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने सुद्धा एका व्हिडीओतुन भारत- पाकिस्तानच्या सामन्यावर भाष्य केले आहे. भारताविरुद्धच्या अपयशानंतर शोएब अख्तरने कर्णधार बाबर आझमच्या नेतृत्वाला जबाबदार धरले आहे. इतकेच नाही तर हा सामना अटीतटीचा झाला असला तरी दोन्ही संघांनी अनेक प्रसंगी अगदी वाईट खेळीचे प्रदर्शन केल्याचे सुद्धा शोएब यांनी म्हंटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

केवळ पाकिस्तानच नव्हे तर भारताने सुद्धा खेळात अनेक चुका केल्या मात्र या चुका आपल्या फायद्यात बदलू न शकल्याने पाकिस्तानचा पराभव झाला असा अख्तर यांच्या बोलण्याचा रोष होता असे दिसतेय. “रिजवानसारख्या खेळाडूने ४५ चेंडूत ४५ धावा केल्या तर काय फरक पडेल. रिझवानने पॉवरप्लेमध्ये 19 डॉट बॉल खेळले. जर तुम्ही पॉवरप्ले असाच जाऊ दिला तर पराभव होणार हे निश्चित असते” असे म्हणत शोएब अख्तर यांनी पाकिस्तानच्या फलंदाजांना पराभवासाठी कारणीभूत ठरवले आहे.

(नक्की वाचा>> Viral Video: कॉन्फिडन्स असावा तर असा! विजयी षटकार मारण्याआधी पांड्याने केलं असं काही की…)

पुढे अख्तर म्हणतात की, ” मी बाबर आझमला अनेकदा सांगितले आहे की त्याने टी20 फॉरमॅटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करावी. फखर जमानला रिझवानसोबत भागीदारीसाठी पाठवावे. आसिफ अलीच्या आधी शादाब खानला फलंदाजीसाठी पाठवले. बाबर आझम कसा कर्णधार आहे, हे माझ्या आकलनापलीकडचे आहे.”

शोएब अख्तरची पाकिस्तानी खेळाडूंवर टीका

शोएब अख्तरने भारताच्या प्लेइंग ११ वरही प्रश्न केले आहे. भारतानेही सामना हरण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. ऋषभ पंतला प्लेइंग ११ मध्ये स्थान देण्यात आले नाही, फॉर्ममध्ये असतानाही त्याची निवड न करण्यावरून इतकेच दिसते की रोहितलाही कर्णधारपद कसे हाताळायला हवे हे फार कळले नव्हते. भारतीय संघाने रविवारी प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर पाच गडी आणि दोन चेंडू राखून विजय प्राप्त केला आहे. भारताचा पुढचा सामना ३१ ऑगस्टला हाँग काँग सोबत पार पडणार आहे.