आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पध्रेत भारताच्या हिना सिधूची एका गुणाच्या फरकाने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात अंतिम फेरी हुकली. हिनाने ३८४ गुणांची कमाई करत १२वे स्थान पटकावले, तर अव्वल दहा खेळाडूंनी ३८५ गुणांसह अंतिम फेरीत स्थान पक्के केले. भारताच्या श्वेता सिंग आणि श्री निवेथा परमनाथम यांना अनुक्रमे ३७८ व ३७७ गुणांसह ४७ व ५२ व्या स्थानावर समाधान मानावे लागले.
पुरुषांच्या ५०-मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकाराच्या पात्रता फेरीत भारताच्या चेन सिंगला ११७० गुणांसह ३८व्या स्थानावर समाधान मानावे लागले. अमेरिकेच्या मॅथ्यू इमोन्सने सुवर्णपदक पटकावले.

Story img Loader