नागरी विमानवाहतूक मंत्रालयाने विमान कंपन्यांना नेमबाजपटूंच्या शस्त्रांसाठी अधिक शुल्क आकारण्याचे ठरवले असून विश्वविजेती राही सरनोबतसह अंजली भागवत आणि तेजस्विनी सावंत यांनी या निर्णयाला विरोध केला आहे. राहीने नागरी विमान वाहतूकमंत्र्यांना यासंदर्भात पत्र लिहिले असून यामध्ये या निर्णयाचा पुनर्विचार करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.
राहीने नागरी विमानवाहतूकमंत्री अजित सिंग यांना पत्र लिहिले असून विमान कंपन्यांनी आमच्या शस्त्रांवर अधिक भार लावला असून याचा विपरीत परिणाम सर्व नेमबाजपटूंवर होणार आहे. त्यामुळे या अधिक भाराच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यात यावा.
राहीसह नेमबाजपटूंचा विमानवाहतूक मंत्रालयाच्या निर्णयाला विरोध
नागरी विमानवाहतूक मंत्रालयाने विमान कंपन्यांना नेमबाजपटूंच्या शस्त्रांसाठी अधिक शुल्क आकारण्याचे ठरवले असून विश्वविजेती राही सरनोबतसह अंजली भागवत आणि तेजस्विनी सावंत यांनी या निर्णयाला विरोध केला आहे.
First published on: 03-05-2013 at 04:04 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shooter with rahi oppose to the decision of government