कोल्हापूरच्या राही सरनोबत हिने कोरियात झालेल्या आयएसएसएफ जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत भारताचा तिरंगा डौलाने फडकावला आहे. २५ मीटर स्पोर्ट्स पिस्तूल प्रकारात राहीने कोरियाच्याच केओनगे किम हिला ८-६ असे पराभूत करत सुवर्णपदकावर मोहोर उमटवली. जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी राही ही पहिली भारतीय पिस्तूल नेमबाज ठरली आहे.
राहीने ५८५ गुणांसह उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. त्यानंतर १५ गुणांची कमाई करून तिने अंतिम फेरीत मजल मारली. सात फेऱ्यांच्या अंतिम लढतीत पाचव्या फेरीअखेर राही ४-६ अशा पिछाडीवर पडली होती. अखेर सुरेख कामगिरी करून पुढील दोन्ही फेऱ्या जिंकून राहीने सुवर्णपदकावर नाव कोरले. जागतिक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या अंजली भागवत, गगन नारंग, संजीव राजपूत, राज्यवर्धन सिंग राठोड, रंजन सोधी आणि मानवजीत सिंग संधू या नेमबाजांच्या यादीत आता राहीची भर पडली आहे.
राहीचा ‘सुवर्ण’भेद!
कोल्हापूरच्या राही सरनोबत हिने कोरियात झालेल्या आयएसएसएफ जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत भारताचा तिरंगा डौलाने फडकावला आहे. २५ मीटर स्पोर्ट्स पिस्तूल प्रकारात राहीने कोरियाच्याच केओनगे किम हिला ८-६ असे पराभूत करत सुवर्णपदकावर मोहोर उमटवली.
First published on: 06-04-2013 at 04:39 IST
TOPICSराही सरनोबत
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shooting indias rahi sarnobat wins world cup gold