कोल्हापूरच्या राही सरनोबत हिने कोरियात झालेल्या आयएसएसएफ जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत भारताचा तिरंगा डौलाने फडकावला आहे. २५ मीटर स्पोर्ट्स पिस्तूल प्रकारात राहीने कोरियाच्याच केओनगे किम हिला ८-६ असे पराभूत करत सुवर्णपदकावर मोहोर उमटवली. जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी राही ही पहिली भारतीय पिस्तूल नेमबाज ठरली आहे.
राहीने ५८५ गुणांसह उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. त्यानंतर १५ गुणांची कमाई करून तिने अंतिम फेरीत मजल मारली. सात फेऱ्यांच्या अंतिम लढतीत पाचव्या फेरीअखेर राही ४-६ अशा पिछाडीवर पडली होती. अखेर सुरेख कामगिरी करून पुढील दोन्ही फेऱ्या जिंकून राहीने सुवर्णपदकावर नाव कोरले. जागतिक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या अंजली भागवत, गगन नारंग, संजीव राजपूत, राज्यवर्धन सिंग राठोड, रंजन सोधी आणि मानवजीत सिंग संधू या नेमबाजांच्या यादीत आता राहीची भर पडली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा