जागतिक स्पर्धेतून नेमबाजी वगळला गेल्यास, हा खेळ लवकरच अखेरची घटका मोजेल. त्यामुळेच नेमबाजीला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कायमचे स्थान द्यायला हवे, असे मत भारताची आघाडीची नेमबाज हिना सिधू हिने व्यक्त केले.

बर्मिगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेतून नेमबाजी खेळ वगळल्यामुळे भारतीय ऑलिम्पिक महासंघाने (आयओए) २०२२च्या राष्ट्रकुल स्पर्धेवर बहिष्काराचा इशारा दिल्यानंतर हिनाने आवाज उठवला आहे. आयओएच्या या कठोर भूमिकेविषयी हिना म्हणाली, ‘‘याचा अर्थ आयओए आमच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे. दुसऱ्या पातळीवर सध्या काय घडत असेल, याचा अंदाज लावणे कठीण आहे, पण अन्य खेळांवर टाच येणार असेल तर भारताने राष्ट्रकुल स्पर्धेवर बहिष्कार टाकायला हवा.’’

‘‘हा खेळ चाहत्यांना आकर्षित करणारा नसला तरी अधिकाधिक पदके पटकावून युवा खेळाडूंना आपल्यातील गुणवत्ता दाखवणारा आहे,’’ असेही हिना म्हणाली.

Story img Loader