गतविजेता जॅन्को टिप्सारेव्हिचसह जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानी असणारा स्टॅनिसलॉस वॉवरिंका, मिखाइल युझनी, फॅबिओ फॉगनिनी हे ३० डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या चेन्नई खुल्या टेनिस स्पर्धेत सहभागी होणार आहेत. जागतिक क्रमवारीत ८ ते ८९ मध्ये असणारे एकूण २१ खेळाडू या स्पर्धेत खेळणार आहेत. चार पात्रता फेरीतील खेळाडू आणि थेट प्रवेश मिळवणारे तीन खेळाडूही मुख्य फेरीसाठी पात्र असतील. या स्पर्धेचे पात्रता फेरीचे सामने २८ आणि २९ डिसेंबरला तर मुख्य स्पर्धा ३० डिसेंबर ते ५ जानेवारी या कालावधीत होणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
हॉकी इंडिया लीगसाठी शुक्रवारी खेळाडूंचा लिलाव
नवी दिल्ली : जवळपास १४ देशांतील १५०पेक्षा जास्त खेळाडूंवर सहा फ्रँचायझी पुढील वर्षी होणाऱ्या हॉकी इंडिया लीगच्या दुसऱ्या पर्वासाठी शुक्रवारी बोली लावणार आहेत. स्पर्धेच्या दोन महिनेआधी होणाऱ्या या लिलावात भारतातील ९५ खेळाडूंचाही समावेश आहे. ‘‘बोली लावण्यासाठीची आधारभूत किंमत २६०० अमेरिकन डॉलर ते २५ हजार डॉलर इतकी असणार आहे. या लिलावासाठी १४ देशांमधील १५४ खेळाडू उपलब्ध आहेत,’’ असे हॉकी इंडियाचे सचिव नरिंदर बात्रा यांनी सांगितले. भारताच्या युवा खेळाडूंमध्ये अफ्फान युसुफ, रमणदीप सिंग, मोहम्मद आमीर खान, निकिन थिमय्या तसेच हरज्योत सिंग, गुरजिंदर सिंग यांचा समावेश आहे.
राष्ट्रीय जलतरण : तीन नव्या विक्रमांची नोंद
थिरुवनंतपुरम् : संदीप शेजवळ, साजन प्रकाश आणि माना पटेल यांनी थिरुवनंतपुरम् येथे सुरू असलेल्या ६७व्या राष्ट्रीय जलतरण अजिंक्यपद स्पर्धेत तीन नव्या विक्रमांची नोंद केली. २०० मी ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात संदीपने २ मिनिटे आणि १५.२२ सेकंदांत अंतर पार केले. महिलांमध्ये १०० मी ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात गुजरातच्या माना पटेलने राष्ट्रीय विक्रम मोडला. प्रकाशने ४००मी फ्रीस्टाइल प्रकारात ३ मिनिटे आणि ५८.५१ सेकंदात अंतर पूर्ण करत नवा विक्रम नोंदवला. रिले प्रकारात सानू देबनाथ, राहुल आर.सी, साजन प्रकाश, आरोन डिसुझा यांचा समावेश असलेल्या रेल्वेच्या संघाने कर्नाटक आणि सव्र्हिसेस संघांवर मात केली.
बॅडमिंटन : महाराष्ट्राचा संघ जाहीर
मुंबई : चंदीगढ येथे होणाऱ्या ३८व्या आंतरराज्य बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या कनिष्ठ संघाची निवड करण्यात आली आहे. २९ आणि ३० नोव्हेंबरला ही स्पर्धा होणार आहे. संघ : नारंग चषकासाठी १९ वर्षांखालील मुलांचा संघ : विघ्नेश देवळेकर, चिराग शेट्टी, सुश्रुत करमरकर, कबीर कंझारकर. शफी कुरेशी चषकासाठी १९ वर्षांखालील मुलींचा संघ : रसिका राजे, रेवती देवस्थळे, वैष्णवी अय्यर, करिश्मा वाडकर, अहिल्या हरजाणी. प्रशिक्षक : निखिल कानेटकर.
बॅडमिंटन : शुभंकर डे, निगेल डिसाची आगेकूच
मुंबई : परभणी येथे सुरू असलेल्या वरिष्ठ राज्य बॅडमिंटन स्पर्धेत शुभंकर डे, निगेल डि सा, संकेत शिरभाते यांनी विजयी आगेकूच केली. शुभंकरने विनायक दंडवतेवर २१-१०, २१-६ अशी मात केली. निगेल डि साने निशिकांत मेहेंदळेवर २१-११, २१-५ असा विजय मिळवला. संकेत शिरभातेने अभिषेक कोटवालला २१-१४, २१-१३ असे नमवले. तेजस धायलकरने नारायण गगराणीचा २१-३, २१-१० असा पराभव केला.
कबड्डी : स्वस्तिक, साहसीची विजयी सलामी
मुंबई : मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या ३२व्या जिल्हा अजिंक्यपद चाचणी कबड्डी स्पर्धेत प्रथम श्रेणी गटाच्या लढतींमध्ये स्वस्तिक क्रीडा मंडळ, साहसी कला क्रीडा मंचने विजयी आगेकूच केली. कुल्र्याच्या स्वस्तिक क्रीडा मंडळाने नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळावर ४२-३३ असा विजय मिळवला. संजय जाधवच्या अफलातून पकडी स्वस्तिकच्या विजयाचे वैशिष्टय़ ठरले. साहसी कला क्रीडा मंच, चेंबूरने जोगेश्वरीच्या सह्य़ाद्री क्रीडा मंडळावर १४-१३ अशी निसटती मात केली. साहसीतर्फे रोहन कदमने दमदार चढाया केल्या. सामन्याच्या अखेरच्या मिनिटात दोनच चढाया झाल्या. हा निर्णय सह्य़ाद्री संघाच्या खेळाडूंना न पटल्याने त्यांनी मैदानात गदारोळ घालण्याचा प्रयत्न केला मात्र पंच व सामना समितीच्या ठाम भूमिकेमुळे त्यांना मैदान सोडावे लागले. महिला गटाच्या लढतीत घाटकोपरच्या शिवनेरी मंडळाने भांडुपच्या स्नेहविकास मंडळाचा ४०-१७ असा धुव्वा उडवला.
मुंबई उपनगर जिल्हा शरीरसौष्ठव स्पर्धा
मुंबई : मुंबई उपनगर जिल्हा अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. २४ नोव्हेंबरला छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती, प्रबोधनकार ठाकरे संकुल, विलेपार्ले (पूर्व) येथे ही स्पर्धा होणार आहे. बृहन्मुंबई उपनगर उदय, केसरी, किशोर, कुमार-श्री आणि श्रेष्ठ अशा सहा विविध गटांत ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेतूनच राज्य अजिंक्यपद स्पर्धेकरिता मुंबई उपनगरचा संघ निवडला जाणार आहे. अधिक माहितीसाठी विजय काटदरे ९२२३३५११५० आणि हेमंत पाटील ९८२०५७३७९१ यांच्याशी संपर्क करावा.
द. आफ्रिकेचा पाकिस्तानवर निसटता विजय
जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात डकवर्थ-लुइस पद्धतीद्वारे ४ धावांनी निसटता विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना १५३ धावा केल्या. क्विंटन डी कॉकने सर्वाधिक ४३ धावा केल्या. पाकिस्तानतर्फे जुनैद खान आणि मोहम्मद हाफीझ यांनी प्रत्येकी २ बळी टिपले. पाकिस्तानने ९ षटकांत २ बाद ५९ अशी मजल मारलेली असताना पावसाचे आगमन झाले. डकवर्थ-लुइस पद्धतीनुसार सुधारित लक्ष्य ९.१ षटकांत ६५ धावा होते. मात्र त्यानुसार पाकिस्तान पिछाडीवर असल्याने दक्षिण आफ्रिकेला ४ धावांनी विजयी घोषित करण्यात आले.
हॅरिस शिल्ड : रिझवी, सुळे गुरुजी विजयी
मुंबई : मुंबई शालेय क्रीडा संघटनेतर्फे आयोजित हॅरिस शिल्ड क्रिकेट स्पर्धेत एलिट गटांच्या लढतीत रिझवी स्प्रिंगफिल्ड, आयईएस मॉडर्न इंग्लिश स्कूल, दादर, व्ही. एन. सुळे गुरूजी, हंसराज मोरारजी यांनी विजयी आगेकूच केली. पृथ्वी शॉच्या ५४६ धावांच्या जोरावर रिझवीने ९९१ धावांचा डोंगर उभारला. सेंट फ्रान्सिस असिसीचा पहिला डाव ९२ तर दुसरा डाव १४४ धावांत संपुष्टात आला. पार्ले टिळकचा पहिला डाव ९१ धावांत गडगडला. सुळे गुरुजी संघाने ३४० धावांची मजल मारली. पार्ले टिळकचा दुसरा डाव ९० धावांतच संपुष्टात आला.