खराब सुरुवातीनंतर मुंबईची दमदार मजल
मुंबईकर फलंदाज श्रेयस अय्यरने धडाकेबाज शतकी खेळी साकारली. त्यामुळे रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेच्या ‘ब’ गटातील सामन्यात मुंबईने पहिल्या दिवशी ३ बाद ३१७ अशी दमदार मजल मारली.
रिलायन्स स्टेडियमवरील सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ८६ षटकांत ३.८६च्या सरासरीने धावा केल्या. अय्यर आणि सूर्यकुमार यादव (खेळत आहे ६६) यांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद १९६ धावांची भागीदारी केली आहे. अय्यर १६७ धावांवर खेळत असून, १७६ चेंडूंत १३ चौकार आणि ४ षटकारांसह त्याने ही साकारली आहे.
आदित्य तरेच्या नेतृत्वाखालील मुंबईच्या संघाची सुरुवातीला २ बाद ६४ अशी अवस्था झाली होती. अजितेश अर्गलने धवल कुलकर्णीचा (३) त्रिफळा उडवला. मग सागर माणगालोरकरने श्रीदीप मंगेलाला (११) पायचीत केले. परंतु श्रेयसने संघाचा डाव उत्तमपणे सावरला. सलामीवीर अखिल हेरवाडकर (६७) आणि श्रेयसने तिसऱ्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी केली. हार्दिक पंडय़ाने अखिलला बाद केले.

संक्षिप्त धावफलक
मुंबई (पहिला डाव) : ८६ षटकांत ३ बाद ३१७ (श्रेयस अय्यर खेळत १६७, अखिल हेरवाडकर ६७, सूर्यकुमार यादव खेळत आहे ६६; हार्दिक पंडय़ा १/३१, अजितेश अर्गल १/३४)

Story img Loader