IND vs SA Shreyas Iyear Ignored By Gavaskar: काही दिवसांपूर्वी, दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी श्रेयस अय्यरच्या फॉर्मवरून टीका केली होती. पण त्यांनतर ICC विश्वचषक २०२३ च्या सलग दोन सामन्यांमध्ये अय्यरने आपली क्षमता सिद्ध करून दाखवली.भारताला विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल करणारा श्रीलंकेविरुद्ध मिळवलेला विजय खास ठरला होता. यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याबद्दल गावसकर यांनी अय्यरचे कौतुक केले. तर रविवारी, अय्यरने कोलकाता येथील प्रसिद्ध ईडन गार्डन्सवर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शानदार खेळीने विश्वचषक २०२३ मध्ये त्याची सरासरी (४८.८३) आणखी वाढवली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने विक्रमी बरोबरीचे ४९ वे शतक झळकावलेल्या सामन्यात अय्यरने ८७ चेंडूत ७७ धावा करून आपली प्लेइंग ११ मधील जागा निश्चित केली. विश्वचषकाच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर जाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला भारताने दुसऱ्याच स्थानावर थोपवून ठेवले. या दमदार खेळानंतर स्टार स्पोर्ट्सवर थोडक्यात गप्पा मारण्यासाठी अय्यरला बोलावण्यात आले होते. मात्र त्यावेळेस त्यांना मैदानात अशी एक गोष्ट दिसली की गावसकर प्रचंड चिडले आणि त्यांनी अय्यरला एकही प्रश्न विचारला नाही.

याविषयी नंतर स्पष्टीकरण देत गावसकर म्हणाले की, “हो, मला त्याला काहीतरी विचारायचे होते, पण माझं लक्ष विचलित झालं कारण तितक्यात मला समोर एका कंपनीचे नाव असलेला भारतीय ध्वज दिसला होता. आणि तुम्हाला माहिती आहे की, याला खरोखर परवानगी नाही. भारताच्या ध्वजाची कोणत्याही प्रकारे विटंबना करणे गैर आहे.”

हे ही वाचा<< “एवढ्या पोकळ..”, सुनील गावसकर भारतीय फलंदाजावर भडकले; म्हणाले, “विराट कोहली ७०-८० वर..:

“ते (ध्वजवाहक) आता गेले आहेत. खरं तर, मला विश्वास आहे की, पुढच्या वेळी पोलिसांना असे काही दिसले की, त्यांनी ध्वज जप्त करायलाच हवाच पण त्याच बरोबर अशा लोकांना अशी जाहिरात करू नये असे बजावले पाहिजे. भारताच्या ध्वजावर कंपनी किंवा त्यांचे उत्पादन असणे हे गैर आहे. मला माफ करा, मी थोडा विचलित झालो. मला माहित आहे की रवी (शास्त्री) यांना मी श्रेयसला प्रश्न विचारावा असे वाटत होते, पण मी फक्त त्या मुलांकडे पाहत होतो, आणि त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होतो,” गावसकर पुढे म्हणाले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shreyas iyear ignored by sunil gavaskar angry says i saw people disrespecting indian flag in ground got distracted video ind vs sa svs