Dhanashree Verma Instagram Story Viral : भारतीय संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर दुखापग्रस्त झाल्याने यंदाच्या आयपीएल हंगामाला मुकला आहे. तसंच श्रेयस जूनमध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्येही टीम इंडियासाठी खेळणार नाहीय. आयपीएल सुरु होण्याआधीच श्रेयसला पाठीची दुखापत झाली आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या वनडे सीरिजमध्येही तो खेळला नाही. त्यानंतर आयपीएलमध्ये श्रेयस खेळणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या पण तो वेळेवर फिट न झाल्याने त्याला आता सर्जरी करावी लागणार आहे. पण त्याआधी श्रेयस अय्यरने त्याच्या जवळच्या मित्रमंडळीसोबत इफ्तार पार्टी केली आहे.
श्रेयस अय्यरने धमाल केलेल्या इफ्तार पार्टीचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. याचदरम्यान त्याचा सहकारी युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माही या पार्टीत सामील झाली होती. धनश्रीने इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट करत छानसं कॅप्शनही दिलं आहे. ‘माय क्यूटीज’ असं कॅप्शन धनश्रीने इन्स्टास्टोरीला दिलं आहे. या फोटोत श्रेयस अय्यरही असल्याचं पाहायला मिळत आहे. शार्दुल ठाकूरच्या लग्नसोहळ्यातही श्रेयस अय्यर आणि धनश्री वर्मा यांनी उपस्थित राहिले होते. तसंच सूर्यकुमार यादव आणि त्याच्या कुटुंबियांनी आयोजित केलेल्या डीनर पार्टीतही त्यांनी उपस्थिती दर्शवल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
युझवेंद्र चहल आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी संघासाठी खेळत आहे. चहलची पत्नी धनश्री त्याला मैदानात सपोर्ट करतानाही दिसली होती. चहलनेही पत्नीच्या सहयोगाचं कौतुक केलं होतं. चहलने या आयपीएलमध्ये शानदार सुरुवात केली आहे. पहिल्या सामन्यात चहलने चार विकेट्स घेतले. पण दुसऱ्या सामन्यात चहलला चमकदार कामगिरी करता आली नाही.