Shreyas Iyer Bowling Action Similar to Sunil Narine video viral : एकीकडे टीम इंडिया आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ब्रेकवर असताना दुसरीकडे भारतात बुची बाबू स्पर्धा खेळवली जात आहे. या स्पर्धेत भारतीय संघातील अनेक खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. या स्पर्धेत अप्रतिम कामगिरी करून काही खेळाडू बांगलादेश कसोटी मालिकेपूर्वी निवड समितीचे लक्ष वेधून घेतील. यापूर्वी इशान किशनने शानदार शतक झळकावून टीम इंडियात पुनरागमन करण्याचे संकेत दिले आहेत. आता श्रेयस अय्यरने आपल्या बॉलिंग ॲक्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

श्रेयसची सुनील नरेनच्या शैलीत गोलंदाजी –

बुची बाबू या स्पर्धेत श्रेयस अय्यर मुंबई संघाचे नेतृत्व करत आहे. या स्पर्धेदरम्यान, मुंबई आणि टीएनसीए इलेव्हन यांच्यात सामना झाला. या सामन्यात श्रेयस अय्यर मुंबईसाठी गोलंदाजी करताना दिसला. अय्यरची गोलंदाजी बघून चाहते आश्चर्यचकित झाले. कारण अय्यरची बॉलिंग ॲक्शन वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू सुनील नरेनसारखीच आहे. आता अय्यरच्या गोलंदाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Vinod Kambli Emotional Statement on Sachin Tendulkar Said He Paid for My Surgeries
VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Marathi actress Kishori Shahane Dance on varun Dhawan song video goes viral
Video: “लय भारी ताई”, किशोरी शहाणेंचा वरुण धवनच्या गाण्यावर एनर्जेटिक डान्स, नेटकरी करतायत कौतुक
Little girl Dance
“काय भारी नाचते राव ही”, गोंडस चिमुकलीने केला जबरदस्त डान्स, Viral Video पाहून तिचे चाहते व्हाल
Lalu Prasad Yadav Controversial comment
Lalu Prasad Yadav Video : “नयन सेंकने….”; नितीश कुमार यांच्या महिला संवाद यात्रेबद्दल लालू प्रसाद यादव यांचं आक्षेपार्ह वक्तव्य
Maharashtrachi Hasya Jatra inside rehearsal video
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर ‘अशी’ होते रिहर्सल! शिवालीने केलं भन्नाट ‘टंग ट्विस्टर’, मालवणी भाषा अन्…; पाहा व्हिडीओ

श्रेयस अय्यरच्या गोलंदाजीने वेधले सर्वांचे लक्ष्य –

रिपोर्टनुसार, टीम इंडियाचे नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचे मत आहे की, भारतीय संघाच्या प्रत्येक खेळाडूने थोड्या प्रमाणात का होईना गोलंदाजी केली पाहिजे, जेणेकरून सामन्याच्या मध्यात संघाला मदत करता येईल. जेव्हापासून गौतम गंभीर संघाचा प्रशिक्षक झाला आहे, तेव्हापासून सूर्यकुमार यादव आणि रिंकू सिंग यांना गोलंदाजी करताना पाहिले आहे. आता श्रेयस अय्यरही त्यांचा पावलावर पाऊल ठेवताना दिसत आहे. कारण त्यांचा गोलंदाजी करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या षटकात अय्यरने केवळ ७ धावा दिल्या होत्या.

हेही वाचा – Jay Shah : जय शाह ICC चे पाचवे भारतीय अध्यक्ष, जाणून घ्या याआधी कोणी सांभाळलीय जबाबदारी?

श्रेयस अय्यर सध्या फलंदाजीत खराब फॉर्ममधून जात आहे. यापूर्वी अय्यर श्रीलंका दौऱ्यावर एकदिवसीय मालिकेत खेळताना दिसला होता, या मालिकेतही अय्यरने बरीच निराशा केली होती. आता बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी अय्यरला टीम इंडियात स्थान मिळवायचे असेल, तर त्याला देशांतर्गत क्रिकेटमध्ये फलंदाजीने चांगली कामगिरी करावी लागेल.

Story img Loader