Shreyas Iyer Double Century in Ranji Trophy Mumbai vs Odisha: एकीकडे बॉर्डर गावसकर ट्रॉफीची जोरदार चर्चा आहे आणि यादरम्यानच रणजी ट्रॉफीचे सामनेही खेळवले जात आहेत. रणजी ट्रॉफीतील मुंबई वि ओडिशाच्या सामन्यात श्रेयस अय्यरने विस्फोटक फलंदाजी करत द्विशतक झळकावले आहे. रणजी सामन्यांमध्ये श्रेयस अय्यर फलंदाजीत चमकदार कामगिरी करत आहे. गेल्या महिन्यातच मुंबईकडून खेळताना त्याने महाराष्ट्राविरुद्ध शानदार शतक झळकावले होते आणि आता त्याने द्विशतक झळकावून मोठा धमाका केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्रिपुराविरुद्धच्या तिसऱ्या फेरीच्या सामन्यात श्रेयस अय्यर सहभागी झाला नव्हता. त्याच्या खांद्याला दुखापत झाल्याने तो खेळू शकला नाही. मात्र, परत येताच त्याने शतक झळकावले आणि त्यानंतर द्विशतक झळकावले. अय्यरने पहिल्या दिवशी १०१ चेंडूत शतक झळकावले. दिवसअखेर त्याने १५० धावांचा टप्पा ओलांडला होता. अशाप्रकारे त्याने लागोपाठ सामन्यांमध्ये शतक झळकावण्याची मोठी कामगिरी केली.

हेही वाचा – Rohit Sharma: “रोहितला त्याच्या मुलाच्या जन्मासाठी थांबायचे असेल…”, हिटमॅनबद्दलच्या वक्तव्यावर आरोन फिंचने गावस्करांना दिले चोख प्रत्युत्तर

रणजी ट्रॉफीत द्विशतक झळकावत श्रेयस अय्यरने मोडला स्वत:चाच विक्रम

पहिल्या दिवशी नाबाद परतल्यानंतर अय्यरने दुसऱ्या दिवशी झंझावाती द्विशतक झळकावले. यासह अय्यरने मोठा विक्रम रचला. श्रेयस अय्यरने २०१ चेंडूत २० चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने रणजी ट्रॉफीतील तिसरे द्विशतक झळकावले. ९ वर्षांनंतर रणजीमधील त्याचे हे पहिलेच द्विशतक आहे. यापूर्वी त्याने २०१५ मध्ये ही मोठी कामगिरी केली होती.

हेही वाचा – Video: अल्झारी जोसेफ कर्णधारावरच भडकला, रागाच्या भरात थेट गेला मैदानाबाहेर, १० खेळाडूंसह खेळण्याची वेस्ट इंडिजवर ओढवली वेळ

श्रेयस अय्यर २२८ चेंडूत २३३ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. या शानदार खेळीत त्याने २४ चौकार आणि ९ षटकार लगावले. अशाप्रकारे श्रेयस अय्यरने रणजी ट्रॉफीतील सर्वोच्च धावसंख्या उभारण्यात यश मिळवले. याआधी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये अय्यरची सर्वोच्च धावसंख्या नाबाद २०२ धावा होती. नऊ वर्षांनंतर अय्यरने रणजी ट्रॉफीमध्ये द्विशतक झळकावले आहे. त्याच्या कारकिर्दीतील ही सर्वात मोठी खेळी आहे.

हेही वाचा – Rishabh Pant Video: याला म्हणतात संस्कार! ऋषभ पंतचा आईबरोबरचा एअरपोर्टवरील व्हीडिओ होतोय व्हायरल, ऑस्ट्रेलियाला झाला रवाना

श्रेयस अय्यरने या वर्षी जानेवारीत इंग्लंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. यानंतर पाठीच्या दुखापतीमुळे तो संघाबाहेर होता. काही दिवसांनी त्याला बीसीसीआयच्या केंद्रीय करारातूनही वगळण्यात आले. त्यानंतर त्याच्या नेतृत्वाखाली, कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघाने आयपीएल २०२४ चे विजेतेपद जिंकण्यात यश मिळविले. असे असतानाही केकेआरने त्याला रिटेन केले नाही. आता अय्यर मेगा लिलावात नशीब आजमावताना दिसणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shreyas iyer double century after 9 year for mumbai scores career best first class 233 runs innings mumbai vs odisha bdg