India vs Sri Lanka ICC Cricket World Cup 2023 Match Updates: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा श्रीलंकेविरुद्ध ४ धावा करून बाद झाला, मात्र विराट कोहली (८८ धावा), शुबमन गिल (९२ धावा) आणि श्रेयस अय्यर यांच्या ८२ धावांची खेळी केली. ज्यामुळे भारतीय संघाने ८ गडी गमावून ३५७ धावांची मोठा डोंगर उभा केला. या सामन्यात श्रेयस अय्यरने आपल्या डावात ६ षटकार ठोकले. त्याने रोहित शर्मा आणि कपिल देव यांच्या उत्कृष्ट विक्रमाची बरोबरी केली. त्याचवेळी, भारतीय क्रिकेट संघाने या सामन्यात ३५७ धावांच्या खेळीच्या जोरावर पाकिस्तानचा ४ वर्ष जुना विक्रमही मोडला.

श्रेयसने रोहित शर्मा आणि कपिल देवच्या विक्रमाशी केली बरोबरी –

श्रेयस अय्यरने श्रीलंकेविरुद्ध ८२ धावा केल्या आणि यादरम्यान त्याने ६ षटकार आणि ३ चौकार मारले. या षटकारांसह त्याने रोहित शर्मा आणि कपिल देव यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. खरं तर, श्रेयस अय्यर आता रोहित आणि कपिलनंतर भारतासाठी विश्वचषकाच्या एका डावात ६ षटकार मारणारा तिसरा फलंदाज ठरला आहे.

Morne Morkel Unhappy on Hardik Pandya Bowling
IND vs BAN : बांगलादेशविरुद्धच्या T20I मालिकेपूर्वी गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्केल हार्दिकवर नाराज? जाणून घ्या कारण
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Kamindu Mendis becomes fastest Asian to hit 5 Test hundreds equals Don Bradman Record SL vs NZ
Kamindu Mendis: ८ सामन्यांत पाचवं शतक; कामिंदू मेंडिस विक्रमी खेळीसह डॉन ब्रॅडमन यांच्या मांदियाळीत
IND vs BAN Shubman Gill fifth Test century against Bangladesh
IND vs BAN : शुबमनने शतक झळकावत भारताचा बाबर म्हणणाऱ्यांची बोलती केली बंद, भारताने बांगलादेशला दिले ५१५ धावांचे लक्ष्य
Rohit Sharma Became First Captain to Complete 1000 Runs in 2024 IND vs BAN 1st Test
IND vs BAN: रोहित शर्माने चेन्नई कसोटीत केला मोठा पराक्रम; २०२४ मध्ये ही कामगिरी करणारा ठरला पहिला कर्णधार
Travis Head Broke Rohit Sharma Record in ENG vs AUS ODI
ENG vs AUS: ट्रेव्हिस हेडने विक्रमी खेळीसह मोडला रोहित शर्माचा वनडेमधील मोठा विक्रम, ‘बॅझबॉल’चाही उडवला धुव्वा
Virat Kohli chanted om namah shivay Gautam Gambhir listened Hanuman Chalisa
कोहलीने कोणत्या सीरिजमध्ये प्रत्येक चेंडूपूर्वी ओम नम: शिवाय म्हटलं? गंभीरसाठी हनुमान चालिसा कशी ठरली किमयागार?
IND vs BAN Rohit Sharma on KL Rahul and Sarfaraz Khan ahead 1st Test match
IND vs BAN : केएल राहुल की सर्फराझ खान? रोहित शर्माने केले स्पष्ट; ‘या’ खेळाडूला मिळणार प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी

हेही वाचा – IND vs SL: विराट कोहलीने मोडला सचिन तेंडुलकर यांचा १६ वर्षे जुना विश्वविक्रम! तब्बल ‘इतक्या’ वेळा केल्या एका वर्षात १००० धावा

कपिल देवने १९८३ मध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या खेळीत ६ षटकार मारले होते, तर याच वर्षी रोहित शर्माने पाकिस्तानविरुद्धच्या खेळीत ६ षटकार मारले होते. दुसरीकडे, विश्वचषकातील वनडे डावात सर्वाधिक षटकार ठोकणारे भारताचे फलंदाज सौरव गांगुली आणि युवराज सिंग आहेत, ज्यांनी १९९९ आणि २००७ मध्ये हा पराक्रम केला होता. हे दोन्ही फलंदाज संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर आहेत, तर श्रेयस आता कपिल आणि रोहितसह संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.

एकदिवसीय विश्वचषकाच्या एका डावात भारतासाठी सर्वाधिक षटकार ठोकणारे फलंदाज –

७ – सौरव गांगुली विरुद्ध श्रीलंका, टॉंटन, १९९९
७ – युवराज सिंग विरुद्ध बर्म्युडा, पोर्ट ऑफ स्पेन, २००७
६ – कपिल देव विरुद्ध झिम्बाब्वे, टुनब्रिज वेल्स, १९८३
६ – रोहित शर्मा विरुद्ध पाकिस्तान, अहमदाबाद, २०२३
६ – श्रेयस अय्यर विरुद्ध श्रीलंका, वानखेडे, २०२३

भारताने मोडला पाकिस्तानचा विक्रम –

भारताने श्रीलंकेविरुद्ध ५० षटकात ८ विकेट गमावत ३५७ धावा केल्या. आता हा संघ विश्वचषकात एकही शतक न करता सर्वाधिक धावा करणारा संघ बनला आहे. या सामन्यात भारताकडून एकाही फलंदाजाने शतक झळकावले नाही. याआधी विश्वचषकात शतक न करता सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम पाकिस्तानच्या नावावर होता, ज्याने २०१९ साली नॉटिंगहॅममध्ये इंग्लंडविरुद्ध ८ विकेट गमावत २४८ धावा केल्या होत्या. आता भारताने पाकिस्तानचा ४ वर्ष जुना विक्रम मोडून पहिला क्रमांक पटकावला आहे.

हेही वाचा – Rashid Latif: पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ, दिग्गज क्रिकेटपटूला ३० कोटींची कायदेशीर नोटीस, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

वैयक्तिक शतकाशिवाय सर्वोच्च सांघिक धावसंख्या (विश्वचषकात) –

३५७/८ – भारत विरुद्ध श्रीलंका, मुंबई, २०२३
३४८/८ – पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड, नॉटिंगहॅम, २०१९
३४१/६ – दक्षिण आफ्रिका विरुद्ध यूएई, वेलिंग्टन, २०१५
३३९/६ – पाकिस्तान विरुद्ध यूएई, नेपियर, २०१५
३३८/५ – पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका, स्वानसी, १९८३