Shreyas Iyer Smashed Hundred : श्रेयस अय्यरने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये जे काही केले, त्याला योग्य वेळी मोठा धमाकी करणे म्हणतात. त्याने आयपीएल २०२५ च्या महालिलावाच्या एक दिवस अगोदर गौव्याविरुद्ध झंझावाती शतक झळकावले. या खेळीत त्याने ११ चौकार आणि १० षटकार लगावले. आयपीस २०२५ चा लिलाव २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. आणि त्याआधी २३ नोव्हेंबर रोजी मुंबईच्या कर्णधाराने वादळी शतक झळकावले. आयपीएल २०२५ च्या लिलावापूर्वी श्रेयस अय्यरच्या झंझावाती शतकाने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
श्रेयस अय्यरने दिली कर्णधारपदाची?
आयपीएलच्या गेल्या मोसमात अय्यर केकेआरचा कर्णधार होता. त्याच्या नेतृत्वाखाली केकेआरने आयपीएलच्या शेवटच्या हंगामाचे विजेतेपदही पटकावले होते. पण आयपीएल २०२५ च्या लिलावापूर्वी कोलकाता फ्रँचायझीने अय्यरला कायम ठेवले नाही. आता अय्यरवर महालिलावात मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. कारण आरसीबी, डीसी, केकेआर, आणि पंजाब किंग्ज संघाला कर्णधाराची गरज आहे.
श्रेयस अय्यरने ४७ चेंडूत झळकावले वादळी शतक –
आयपीएल २०२५ च्या महालिलावापूर्वी अय्यरचे शतक हे कर्णधारपदासाठी ऑडिशन आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मुंबईचे कर्णधार असलेल्या श्रेयस अय्यरने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना गोव्याविरुद्ध शतक झळकावले. त्याने ५७ चेंडूंचा सामना करताना १३० धावा केल्या. २२८.०७ च्या स्ट्राईक रेटने खेळलेल्या अय्यरच्या डावात १० षटकार आणि ११ चौकारांचा समावेश होता. मात्र या काळात त्याने केवळ ४७ चेंडूत आपले शतक पूर्ण केले.
गोव्याविरुद्ध मुंबईने २० षटकांत २५० धावा केल्या –
कर्णधार श्रेयस अय्यरच्या शानदार शतकाच्या जोरावर मुंबईने गोव्याविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ४ गडी गमावून २५० धावा केल्या. अय्यरशिवाय शम्स मुलानीने २४ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने संघाकडून ४१ धावा केल्या. याआधी अय्यरने रणजी ट्रॉफीमध्ये ओडिशाविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात द्विशतक (२३३) झळकावले होते. यापूर्वी महाराष्ट्राविरुद्ध झालेल्या सामन्यात अय्यरने १४२ धावांची खेळी केली होती. अय्यरच्या सातत्यपूर्ण चमकदार खेळीमुळे तो संघात का स्थान मिळवू शकला नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे.