Shreyas Iyer Rohit Sharma Viral Video: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा नुकताच एका पुरस्कार सोहळ्यासाठी पोहोचला होता. सीएट क्रिकेट रेटिंग पुरस्कार सोहळ्याला भारताच्या काही खेळाडूंनी हजेरी लावली होती. ज्यामध्ये भारताचे आजी माजी खेळाडू उपस्थित होते. तर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनीही उपस्थिती लावली होती. यादरम्यानचा रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यात रोहित शर्मा आल्यावर श्रेयसने उठून त्याला आपली खुर्ची बसायला दिली आहे.
Shreyas Iyer Rohit Sharmaचा पुरस्कार सोहळ्यातील व्हायरल व्हीडिओ
रोहित शर्माच्या नेतृत्त्वाचे कायमचं कौतुक होताना आपण पाहतो, खेळाडूही त्याच्या नेतृत्त्वात बिनधास्त खेळत चांगली कामगिरी करतात. संघातही त्याचे कौतुक आणि आदर करणाऱ्या खेळाडूंची यादी मोठी आहे. रोहित शर्मा खेळाडूंना जितका पाठिंबा देतो तितकेच खेळाडूही त्याला मान देतात. पुरस्कार सोहळ्यात एका घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रोहित शर्मा बुधवारी एका पुरस्कार सोहळ्यासाठी पोहोचला, तिथे आधीच उपस्थित असलेल्या श्रेयस अय्यरने त्याला पाहताच आपली खुर्ची त्याला दिली आणि स्वत: दुसऱ्या खुर्चीवर बसला.
हेही वाचा – Gautam Gambhir: गौतम गंभीरने निवडली ऑल टाईम इलेव्हन; पाकिस्तानच्या तीन खेळाडूंना मिळालं स्थान
रोहित शर्मा ‘सीएट क्रिकेट रेटिंग अवॉर्ड्स’मध्ये पोहोचला होता, जिथे त्याला वर्षातील सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पुरुष क्रिकेटर म्हणून निवडले गेले. तो या कार्यक्रमाला आला तेव्हा त्याला पाहताच श्रेयस अय्यर आपली जागा सोडून उठून उभा राहिला. यानंतर तोही रोहित शर्मासोबत उभा राहिला आणि त्याला आपल्या खुर्चीवर बसण्यास सांगितले. रोहित आणि श्रेयसचा हा व्हीडिओ व्हायरल होत आहे. जो पाहून सर्वजण श्रेयसचे कौतुक करत आहेत.
खरंतर या कार्यक्रमासाठी रोहित शर्माला पहिल्या खुर्चीवर बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती, रोहित पहिल्याच खुर्चीवर बसणार होता पण त्याच्याबरोबर त्याची पत्नी रितिका सजदेहदेखील होती. श्रेयस अय्यर जिथे बसला होता तिथे मागे खुर्ची रिकामी होती. तर रोहित आल्यावर श्रेयस लगेच उभा राहिला आणि त्याने आपली खुर्ची रोहितला दिली. रोहित त्याला नकार देत होता, पण तरीही श्रेयसने त्याला बसण्यासाठी मनवलं आणि स्वत: पुढे जाऊन बसला. कर्णधाराला उभे पाहून श्रेयस अय्यरची कृती पाहून त्याने सर्वांची मनं जिंकली आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून श्रेयसचे कौतुक होत आहे.
© IE Online Media Services (P) Ltd