IND vs ENG Shreyas Iyer statement : भारत आणि इंग्लंड संघातील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज नागपूरमध्ये खेळला जात आहे. या सामन्यातून स्टार फलंदाज श्रेयस अय्यर दीर्घ कालावधीनंतर वनडे संघात पुनरागमन केले आहे. ऑगस्ट २०२३ मध्ये भारताच्या श्रीलंका दौऱ्यात तो भारताकडून शेवटचा खेळला होता. गौतम गंभीर प्रशिक्षक झाल्यानंतर, तो एकदिवसीय संघाच्या सेटअपचा एक भाग आहे. दरम्यान, त्याने आपल्या यशाचे रहस्य सांगितले आहे. यशाच्या मागे धावत नाही तर ते मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करतो, असे तो म्हणाला.

बीसीसीआयने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये श्रेयस अय्यर म्हणाला, “मी यशाच्या मागे धावत नाही. मी दैनंदिन दिनचर्या पाळतो, ज्यामुळे मला यश मिळेल. माझ्यासाठी, चॅम्पियन मी आहे. मला वाटते की हे सर्व तुमच्या मनात आहे. मला वैयक्तिकरित्या असे वाटते की तुमच्याशिवाय तुम्हाला साथ देणारे कोणी नाही.”

IND vs ENG Stampede scenes during 2nd ODI ticket sale in Cuttack few fans fall unconscious
IND vs ENG: भारत-इंग्लंड वनडे तिकिट विक्रीदरम्यान कटकमध्ये चेंगराचेंगरी, काही जण झाले बेशुद्ध; VIDEO व्हायरल
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
IND vs ENG Jasprit Bumrah To Miss ODI Series Against England Suspense on Playing Champions Trophy
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध वनडे संघातून जसप्रीत बुमराहचं नाव गायब, BCCIचं मौन; चॅम्पियन्स ट्रॉफीला मुकणार?
IND vs ENG ODI Series Full Schedule Timings and Squads in Detail India England
IND vs ENG: भारत वि इंग्लंड वनडे मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक वाचा एकाच क्लिकवर! जाणून घ्या सामन्याची नेमकी वेळ
Varun Chakaravarthy trains with ODI squad in Nagpur ahead of India vs England series
IND vs ENG: भारताचा मिस्ट्री स्पिनर अचानक इंग्लंडविरूद्ध वनडे संघात दाखल, BCCIने केलं जाहीर; कसा आहे संपूर्ण संघ?
India Beat England by15 Runs and Wins T20I Series
IND vs ENG: पुण्यनगरीत टीम इंडियाने कमावलं मालिका विजयाचं पुण्य; तिसऱ्या टी२० सामन्यात विजयासह विजयी आघाडी
India vs England 4th T20I match today in Pune sports news
फलंदाजांकडून कामगिरी उंचावण्याची अपेक्षा; भारत-इंग्लंड चौथा ट्वेन्टी२० सामना आज पुण्यात
England Beat India by 26 Runs Varun Chakravarthy Fifer Ben Duckett fifty IND vs ENG
IND vs ENG: टीम इंडियाची हुकली विजयाची हॅट्ट्रिक! इंग्लंडचं टी-२० मालिकेत दणक्यात पुनरागमन; वरूण चक्रवर्तीच्या कामगिरीवर फेरलं पाणी

यश एका रात्रीत मिळत नाही –

अय्यर पुढे म्हणाला, “मी नेहमी म्हणतो की तुम्ही वर्तमानात जगले पाहिजे. मी भाग्यवान आहे की मी २०४ मध्ये इतक्या चॅम्पियनशिप जिंकल्या आहेत. मी दररोज घेत असलेल्या मेहनतीच परिणाम मला नक्कीच मिळणार. एकूणच हा प्रवास तुम्हाला खूप काही शिकवून जातो. तुम्ही काही जिंकता, काही हरता. जर तुम्ही एखाद्या गोष्टीच्या मागे धावत असाल तर ते तुम्हाला नक्कीच सापडेल, पण त्यामागे एक प्रवास असतो. तुम्ही हे एका रात्रीत साध्य करू शकत नाही.”

संपूर्ण लक्ष एकदिवसीय मालिकेवर –

तो पुढे म्हणाला, “सध्या माझे संपूर्ण लक्ष एकदिवसीय मालिकेवर आहे. मी सामन्यानुसार प्रगती करत आहे. जेव्हा मी भारताची जर्सी घालतो तेव्हा मला छान वाटते. हे मला आणखी एका स्तरावर जाण्यास मदत करते. मी कधीही जुन्या गोष्टींचा विचार करत नाही.”

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यासाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, शुबमन गिल, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी

Story img Loader