Shreyas Iyer left out of playing eleven: आशिया चषक २०२३ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुपर फोर सामना कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जात आहे. यामध्ये भारताच्या प्लेइंग इलेव्हन मध्ये दोन बदल करण्यात आले असून श्रेयस अय्यर अनफिट असल्याने केएल राहुलचा संघात समावेश करण्यात आला आहे. या सामन्यात नाणेफेकीनंतर कर्णधार रोहित शर्माने माहिती देताना सांगितले की, श्रेयसला पाठीच्या दुखण्याची समस्या आहे. त्यामुळे त्याला आज संघात स्थान मिळालेले नाही.

पाठीच्या शस्त्रक्रियेनंतर श्रेयस अय्यर आशिया कप २०२३ मध्ये पूर्ण तंदुरुस्त परतला. यानंतर त्याला पाकिस्तान आणि नेपाळ या दोन्ही संघांविरुद्ध गट सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली. अय्यरच्या पाठीची समस्या पुन्हा एकदा टीम इंडियासाठी समस्या बनू शकते. कारण तो आगामी एकदिवसीय विश्वचषक २०२३ संघाचा देखील एक भाग आहे. अय्यरला पाकिस्तानविरुद्धच्या गट-अ सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली आणि तो केवळ १४ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

Sanju Samson broke Yusuf Pathan's 15-year-old record
IND vs SA : संजू सॅमसनने सलग दोन शतकांनंतर केला नकोसा विक्रम, ‘या’ बाबतीत युसूफ-रोहितला टाकले मागे
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
aimim akbaruddin Owaisi marathi news
Akbaruddin Owaisi: “काँग्रेसमुळे मुस्लिमांवर ‘ही’ वेळ”, एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांचा काँग्रेसवर आरोप
Vishwajeet Kadam jayshri patil
Vishwajeet Kadam: जयश्री पाटील यांना बंडखोरीस भाग पाडले – विश्वजित कदम
Maharashtra coach Sulakshan Kulkarni regretted the loss of victory sports news
निराशाजनक पराभवामुळे आव्हान खडतर! विजय निसटल्याची महाराष्ट्राचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांना खंत
Sanju Samson Revelas Suryakumar Yadav and Gautam Gambhir Support him
Sanju Samson : ‘कारकीर्दीत बरेच चढ-उतार आले, पण…’, शतकी खेळीनंतर संजू सॅमसनने ‘या’ दोन माणसांचे मानले आभार
Suryakumar Yadav and Sanju Samson fight with Marco Jansen video viral in IND vs SA 1st T20I
Suryakumar Yadav : संजू सॅमसनला नडणाऱ्या मार्को यान्सनशी भिडला सूर्या, लाइव्ह सामन्यातील वादावादीचा VIDEO व्हायरल
Mohammed Rizwan Takes DRS After Consulting With Adam Zampa and Loses Review Watch Video AUS vs PAK 2nd ODI
PAK vs AUS: हा काय प्रकार? मोहम्मद रिझवानने ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूच्या सांगण्यावरून घेतला रिव्ह्यू अन् सापडला अडचणीत; पाहा VIDEO

अखेर केएल राहुल संघात परतला –

टीम इंडियाच्या मिडल ऑर्डरचा महत्त्वाचा भाग मानला जाणारा केएल राहुल तब्बल ६ महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे. आयपीएलच्या १६व्या मोसमात मांडीचा त्रास झाल्याने राहुल बराच काळ क्रिकेटच्या मैदानाबाहेर होता. आशिया चषक स्पर्धेतील गट सामन्यांपर्यंत त्याला पूर्णपणे तंदुरुस्त घोषित करण्यात आले नव्हते. श्रेयस अय्यर पाकिस्तानविरुद्ध सुपर फोरमध्ये अचानक अनफिट झाल्यानंतर आता त्याचा थेट प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे.

हेही वाचा – Asia Cup 2023: भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का! वनडे क्रमवारीत ‘या’ संघाने हिरावला नंबर वनचा मुकुट

केएल राहुलने आतापर्यंत त्याच्या वनडे कारकिर्दीत चौथ्या क्रमांकावर ७ डाव खेळले आहेत. यामध्ये त्याने ४०.१७च्या सरासरीने एकूण २४१ धावा केल्या आहेत. या महत्त्वाच्या सामन्यात राहुलच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा नक्कीच असतील.

हेही वाचा – IND vs PAK: पाकिस्तानविरुद्ध ७८ धावा करताच रोहित शर्मा करणार मोठा विक्रम, वनडे क्रिकेटमध्ये गाठणार ‘हा’ खास टप्पा

भारताची प्लेइंग इलेव्हन –

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर.