Shreyas Iyer Helping Poor People Video: आशिया चषक २०२३ पूर्वी भारतीय क्रिकेटमध्ये सध्या सर्वाधिक चर्चा २ खेळाडूंच्या फिटनेसची होत आहे. एक केएळ राहुल आणि दुसरा श्रेयस अय्यर. हे दोन्ही खेळाडू आशिया कपमध्ये संघात पुनरागमन करतील अशी अपेक्षा आहे. दरम्यान, श्रेयस अय्यरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये तो फलंदाजी करताना दिसत नसला तरी त्याच्या साधेपणामुळे त्याने सर्व चाहत्यांची मने जिंकली आहेत.

श्रेयस अय्यर गेल्या वर्षी भारतीय संघाच्या मधल्या फळीत महत्त्वाच्या फलंदाजाच्या भूमिकेत दिसला होता, परंतु पाठीच्या दुखापतीच्या समस्येमुळे तो या वर्षातील बहुतांश काळ मैदानाबाहेर आहे. आता शस्त्रक्रियेनंतर तो जवळजवळ पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे घोषित करण्यात आले आहे. आता आशिया चषक आणि एकदिवसीय विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून अय्यर योग्य वेळी संघात पुनरागमन करताना दिसू शकतो.

PV Sindhu gets emotional seeing Vinod Kambli's video
PV Sindhu: विनोद कांबळीचा ‘तो’ व्हिडीओ पाहून पीव्ही सिंधू झाली भावनिक; पैसे, चांगली माणसं याबाबत केलं मोठं विधान
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Titeeksha Tawade
Video : ‘लव्हयापा’ म्हणत तितीक्षा तावडेने शेअर केला व्हिडीओ; एकता व ऐश्वर्या नारकरांनी दिली साथ, पाहा व्हिडीओ
do you know Shrimad Bhagavad Geeta temple in pune
Pune Video : पुण्यातील सुंदर श्रीमद् भगवत गीता मंदिर पाहिले आहे का? कुठे आहे हे मंदिर, जाणून घ्या
Nitish Chavan
‘लाखात एक आमचा दादा’ फेम नितीश चव्हाणने शेअर केला ईशा संजयबरोबर व्हिडीओ; नेटकरी म्हणाले, “नाव सांगू का शीतलला?”
Yuvraj Singh Backs Rohit Sharma Virat Kohli Amid Heavy Criticism on Poor Form
VIDEO: रोहित-विराटच्या मदतीला धावला युवराज सिंग; ट्रोलर्सचा समाचार घेताना म्हणाला…
Karuna Munde Said Thanks to Suresh Dhas
Karuna Munde : करुणा धनंजय मुंडेंनी मानले सुरेश धस यांचे आभार; म्हणाल्या, “माझ्याकडे खूप पुरावे……”
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “मैदानच मोकळं…”, सूर्याची बहीण संकटात सापडणार; प्रोमो पाहिल्यानंतर नेटकरी म्हणाले, “चुकीचा संदेश…”

श्रेयस अय्यरच्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत दिसत आहे की, तो त्याच्या कारमध्ये बसून कुठेतरी जायला निघाला असताना, त्याचवेळी काही गरीब लोक त्याच्याकडे आले आणि मदत मागू लागले. श्रेयस अय्यरने या क्षणी इतर कसलाही विचार न करता, लगेच खिशातून काही पैसे काढून त्यांना दिले. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहतेही अय्यरचे जोरदार कौतुक करत आहेत. तसेच तो लवकरच संघात परतावा अशी इच्छाही व्यक्त करत ​​आहेत.

हेही वाचा – Team India : जय शाह आणि राहुल द्रविड यांच्यात दोन तास बैठक, आशिया कपसह विश्वचषकाच्या तयारीवर केली चर्चा

आशिया चषक आणि विश्वचषकापूर्वी अय्यरला फिटनेस सिद्ध करावा लागेल –

टीम इंडियाला विश्वचषकापूर्वी आशिया कप आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतात एकदिवसीय मालिकेत खेळण्याची संधी मिळणार आहे. यादरम्यान, श्रेयस अय्यरने संघात पुनरागमन केले, तर त्याला विश्वचषकापूर्वी फिटनेस सिद्ध करण्याची मोठी संधी मिळेल. भारताला आशिया चषक स्पर्धेतील सर्व सामने श्रीलंकेत खेळायचे आहेत, ज्यामध्ये भारत २ सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल.

श्रेयस अय्यर आयपीएल २०२३ च्या हंगामालाही मुकला –

श्रेयस अय्यरही दुखापतीमुळे आयपीएलला मुकला होता. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सची कमान नितीश राणाच्या हाती सोपवली. टीम इंडियाला वर्ल्ड कपपूर्वी जवळपास १२वनडे खेळायचे आहेत. अशा स्थितीत अय्यर जितक्या लवकर संघात परतेल तितकी टीम इंडिया वर्ल्ड कपच्या दृष्टीने मजबूत होईल. आशिया चषकानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे, जिथे भारतीय संघ आपल्या उणीवा भरून काढण्याचा प्रयत्न करणार आहे.

Story img Loader