Shreyas Iyer Helping Poor People Video: आशिया चषक २०२३ पूर्वी भारतीय क्रिकेटमध्ये सध्या सर्वाधिक चर्चा २ खेळाडूंच्या फिटनेसची होत आहे. एक केएळ राहुल आणि दुसरा श्रेयस अय्यर. हे दोन्ही खेळाडू आशिया कपमध्ये संघात पुनरागमन करतील अशी अपेक्षा आहे. दरम्यान, श्रेयस अय्यरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये तो फलंदाजी करताना दिसत नसला तरी त्याच्या साधेपणामुळे त्याने सर्व चाहत्यांची मने जिंकली आहेत.
श्रेयस अय्यर गेल्या वर्षी भारतीय संघाच्या मधल्या फळीत महत्त्वाच्या फलंदाजाच्या भूमिकेत दिसला होता, परंतु पाठीच्या दुखापतीच्या समस्येमुळे तो या वर्षातील बहुतांश काळ मैदानाबाहेर आहे. आता शस्त्रक्रियेनंतर तो जवळजवळ पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे घोषित करण्यात आले आहे. आता आशिया चषक आणि एकदिवसीय विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून अय्यर योग्य वेळी संघात पुनरागमन करताना दिसू शकतो.
श्रेयस अय्यरच्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत दिसत आहे की, तो त्याच्या कारमध्ये बसून कुठेतरी जायला निघाला असताना, त्याचवेळी काही गरीब लोक त्याच्याकडे आले आणि मदत मागू लागले. श्रेयस अय्यरने या क्षणी इतर कसलाही विचार न करता, लगेच खिशातून काही पैसे काढून त्यांना दिले. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहतेही अय्यरचे जोरदार कौतुक करत आहेत. तसेच तो लवकरच संघात परतावा अशी इच्छाही व्यक्त करत आहेत.
हेही वाचा – Team India : जय शाह आणि राहुल द्रविड यांच्यात दोन तास बैठक, आशिया कपसह विश्वचषकाच्या तयारीवर केली चर्चा
आशिया चषक आणि विश्वचषकापूर्वी अय्यरला फिटनेस सिद्ध करावा लागेल –
टीम इंडियाला विश्वचषकापूर्वी आशिया कप आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतात एकदिवसीय मालिकेत खेळण्याची संधी मिळणार आहे. यादरम्यान, श्रेयस अय्यरने संघात पुनरागमन केले, तर त्याला विश्वचषकापूर्वी फिटनेस सिद्ध करण्याची मोठी संधी मिळेल. भारताला आशिया चषक स्पर्धेतील सर्व सामने श्रीलंकेत खेळायचे आहेत, ज्यामध्ये भारत २ सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल.
श्रेयस अय्यर आयपीएल २०२३ च्या हंगामालाही मुकला –
श्रेयस अय्यरही दुखापतीमुळे आयपीएलला मुकला होता. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सची कमान नितीश राणाच्या हाती सोपवली. टीम इंडियाला वर्ल्ड कपपूर्वी जवळपास १२वनडे खेळायचे आहेत. अशा स्थितीत अय्यर जितक्या लवकर संघात परतेल तितकी टीम इंडिया वर्ल्ड कपच्या दृष्टीने मजबूत होईल. आशिया चषकानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे, जिथे भारतीय संघ आपल्या उणीवा भरून काढण्याचा प्रयत्न करणार आहे.