इंग्लंडमध्ये ६ ते २३ जूनदरम्यान होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स करंडकासाठी श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेच्या १५ सदस्यीय संघाची निवड गुरुवारी करण्यात आली. या दोन्ही संघांच्या निवडीमध्ये काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. या स्पर्धेसाठी श्रीलंकेच्या संघातून ‘कॅरम बॉल’पटू अजंथा मेंडिसला वगळण्यात आले आहे, तर दक्षिण आफ्रिकेच्या संघातून अनुभवी अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिसला डच्चू देण्यात आला आहे.

अजंथा मेंडिसला वगळले; जयवर्धनेचे पुनरागमन
पीटीआय, कोलंबो
चॅम्पियन्स करंडकासाठी श्रीलंकेच्या संघाचे कर्णधारपद अँजेला मॅथ्यूजला देण्यात आले असून दिनेश चंडिमलला उपकर्णधारपदी बढती देण्यात आली आहे. अजंथा मेंडिसबरोबर उपुल थरंगालाही वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. माजी कर्णधार महेला जयवर्धने याचे संघात पुनरागमन झाले आहे.
संघ : अँजेलो मॅथ्यूज (कर्णधार), दिनेश चंडिमल (उपकर्णधार), तिलकरत्ने दिलशान, कुमार संगकारा, महेला जयवर्धने, कुसल जनिथ परेरा, लहिरू थिरीमाने, जीवन मेंडिस, थिसारा परेरा, लसिथ मलिंगा, रंगना हेराथ, नुवान कुलसेकरा, समिंदा एरांगा, सचित्रा सेनानायके आणि चनाका वेलगेदरा.

डी’व्हिलियर्स कर्णधार; जॅक कॅलिसला डच्चू
पीटीआय, केप टाऊन
पुनरागमनासाठी आतुर असलेल्या जॅक कॅलिसला चॅम्पियन्स करंडकासाठी डच्चू देण्याचा आश्चर्यकारक निर्णय दक्षिण आफ्रिकेच्या निवड समितीने घेतला आहे. तडाखेबंद फलंदाज आणि यष्टीरक्षण या दोन्ही जबाबदाऱ्या पेलवणाऱ्या ए बी डी’व्हिलियर्सकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. दुखापतीतून पूर्णपणे सावरलेल्या जे.पी. डय़ुमिनीचे संघात पुनरागमन झाले आहे.
संघ : ए.बी. डी’व्हिलियर्स (कर्णधार, यष्टीरक्षक), हशीम अमला, फरहान बेहरडिएन, जे.पी. डय़ुमिनी, फॅफ डय़ू प्लेसिस, कॉलिन इनग्राम, रॉरी क्लेइनवेल्ड, रायन मॅकलेरान, डेव्हिड मिलर, मॉर्ने मॉर्केल, रॉबिन पीटरसन, आरोन फँगिसो, ग्रॅमी स्मिथ, डेल स्टेन आणि लोनवाबो त्सोत्सोबे.

Story img Loader