अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चौथा कसोटी सामना सुरु झाला. बॉर्डर गावसकर ट्रॉफीचा हा शेवटचा कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यात शुबमन गिलचा सलामीचा फलंदाज म्हणून समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण क्रिकेटविश्वात शुबमन गिलची चर्चा रंगू लागली आहे. अशातच शुभमनचा मैदानातील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोची इंटरनेटवर तुफान चर्चा सुरु झाली आहे.
ख्वाजाने पहिल्याच दिवशी ठोकलं शतक
कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकलं आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीला आलेल्या उस्मान ख्वाजाने पहिल्याच दिवशी दमदार शतक ठोकलं आहे. ख्वाजा १०४ धावांवर नाबाद असून ऑस्ट्रेलियाने ९० षटकांत २५५ धावा केल्या असून ४ विकेट गमावल्या आहेत. ख्वाजाने आतापर्यंत २५१ चेंडू खेळले असून १५ चौकार ठोकले आहेत. भारतासाठी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने २ विकेट घेतले असून फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजाला १-१ विकेट मिळाली आहे.
इथे पाहा व्हायरल पोस्ट
गिलने घातलेल्या हेल्मेटची होतेय चर्चा
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथ्या कसोटी सामन्यात शुबमन गिलचा हेल्मेट चर्चेचा विषय बनला. गिलने सुंदर स्टाईलने बनवलेला हेल्मेट भारताचं क्षेत्ररक्षण सुरु असताना घातला होता. या हेल्मेटचे फोटोही व्हायरल झाले आहेत. गिलच्या हेल्मेटमध्ये एक ग्रिल लावण्यात आलं होतं. ज्या ग्रिलला पाहून क्रिकेटप्रेमींना अनुभवी क्रिकेटर दिनेश कार्तिकची आठवण झाली. ऑस्ट्रेलियाचा डाव सुरु असताना शुबमन गिलने विशेष हेल्मेट घालून क्षेत्ररक्षण केलं.