Most Searched Athletes on Google : २०२३ हे वर्ष संपण्यासाठी आता फक्त काही दिवस शिल्लक राहिले आहेत. अशा परिस्थितीत, या दिवसात गुगलवर या वर्षात शोधल्या जाणार्या गोष्टींची बरीच चर्चा आहे. आता जर तुम्हाला कोणी विचारले की २०२३ मध्ये गुगलवर कोणत्या क्रिकेटपटूला सर्वाधिक सर्च केले गेले? त्यामुळे यावर उत्तर देताना बहुतेक लोक विराट कोहली आणि रोहित शर्माची नावे घेतील. पण, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, यावर्षी गुगलवर सर्वात जास्त सर्च केलेला क्रिकेटर विराट किंवा रोहित नसून शुबमन गिल आहे.
गुगलने नुकतीच विविध श्रेणींची यादी जारी केली आहे, ज्यामध्ये सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्या गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे. या वर्षी गिल भारतातील टॉप-१० सर्च केलेल्या खेळाडूंमध्ये अव्वल स्थानावर राहिला. त्याचबरोबर जागतिक स्तरावर तो नवव्या स्थावानर राहिला.गिलसाठी हे वर्ष खूप चांगले गेले. त्याने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी केली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तो २०२३ मध्ये सर्वाधिक धावा करणारा क्रिकेटपटू ठरला. या वर्षी गिलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४१ षटकार ठोकले. गिलने २०२३ मध्ये २९ एकदिवसीय सामने खेळले, ज्यामध्ये त्याने १०५.४५ च्या स्ट्राइक रेटने आणि ६३.३६ च्या सरासरीने १५८४ धावा केल्या. या काळात त्याने ५ शतके आणि ९ अर्धशतके झळकावली.
रचिन रवींद्र दुसऱ्या क्रमांकावर –
शुबमन गिलनंतर २०२३ मध्ये भारतात गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या क्रिकेटपटूचे नाव रचिन रवींद्र आहे. तो जागतिक स्तरावर आठव्या क्रमांकावर आहे. होय, न्यूझीलंडच्या या युवा अष्टपैलू खेळाडूने २०२३ च्या विश्वचषकात आपल्या कामगिरीने सर्वांची मने जिंकली. विश्वचषकात ईश सोधीला दुखापत झाल्यानंतर रवींद्रला न्यूझीलंड संघात स्थान मिळाले. त्याने विश्वचषकातील १० सामन्यांमध्ये ५७८ धावा केल्या. रचिन हा भारतीय वंशाचा क्रिकेटर असून त्याला आगामी आयपीएल लिलावात करोडो रुपये मिळू शकतात. रचिनचे क्रिकेटप्रेमी वडील मूळचे बंगळुरूचे आहेत.
हेही वाचा – IND vs SA : रिंकू सिंगने आयसीसी टी-२० क्रमवारीत ४६ स्थानांची घेतली मोठी झेप, आता ‘या’ क्रमांकावर विराजमान
दरम्यान, शुबमन गिल व्यतिरिक्त, न्यूझीलंडचा युवा अष्टपैलू खेळाडू रचिन रवींद्रचा देखील २०२३ मध्ये जागतिक स्तरावर ‘सर्वाधिक शोधलेल्या ॲथलीट्स’च्या यादीत समावेश आहे. या यादीत किवी स्टार रचिन रवींद्र आठव्या स्थानावर आहे. रचिन रवींद्रने २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती आणि अनेक विक्रम मोडीत काढले होते. या स्पर्धेत सर्वाधिक शतके करणारा तो किवी खेळाडू होता.
हेही वाचा – IND vs SA : टीम इंडियाच्या पराभवानंतर रिंकू सिंगने मागितली माफी, काय आहे नेमकं प्रकरण? जाणून घ्या
जागतिक स्तरावर सर्वाधिक सर्च केले गेलेल्या ॲथलीट्सची यादी –
डॅमर हॅमलिन
किलियन एमबाप्पे
ट्रॅव्हिस केल्स
जा मोरंट
हॅरी केन
नोव्हाक जोकोविक
कार्लोस अल्काराज
रचिन रवींद्र
शुबमन गिल
कायरी इरविंग