Shubman Gill breaks Babar Azam’s record: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांत वनडे मालिकेतील पहिला सामना मोहाली येथे पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने ५ विकेट्सने मात केली. त्याचबरोबर तीन सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. या दरम्यान शुबमन गिलने घरच्या मैदानावर एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. गिल मोहालीत पहिल्यांदा एकदिवसीय सामना खेळण्यासाठी आला होता. त्याच्या या खेळीच्या जोरावर त्याने बाबर आझमचा विक्रम मोडीत काढला.

गिलने घरच्या मैदानावर ३७ चेंडूत झळकावले अर्धशतक –

शुबमन गिल त्याच्या घरच्या मैदानावर मोहाली येथे प्रथमच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी आला होत. त्याने ३७ चेंडूत अर्धशतक झळकावले. या सामन्यात त्याने ६३ चेंडूत २ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने ७४ धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध वनडे फॉरमॅटमधील हे त्याचे पहिले अर्धशतकही ठरले. अॅडम झाम्पाने या सामन्यात त्याला क्लीन बोल्ड केले.

शुबमन गिलने मोडला बाबर आझमचा विक्रम –

शुबमन गिल त्याच्या एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीतील पहिल्या ३४ डावांमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर आहे, जिथे बाबर आझम पहिल्यादा होता. गिलने आतापर्यंत ३४ एकदिवसीय सामन्यांमध्ये १८१३ धावा केल्या आहेत, तर बाबर आझमने १६८९ धावा केल्या आहेत. वनडेच्या पहिल्या ३४ डावात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत हाशिम आमला पहिल्या क्रमांकावर आहे, ज्याने १८३४ धावा केल्या आहेत.

हेही वाचा – IND vs AUS: आशिया कप फायनलसाठी पहिल्यांदा आश्विनला बोलावण्यात आले होते, परंतु ‘या’ कारणामुळे त्याने दिला नकार

पहिल्या ३४ वनडे डावांनंतर सर्वाधिक धावा करणारे फलंदाज –

१८३४ धावा – हाशिम आमला
१८१३ धावा – शुबमन गिल
१६८९ धावा – बाबर आझम
१६७४ धावा – व्हॅन डर ड्युसेन

गिल रोहितला टाकू शकतो मागे –

शुबमन गिलने या सामन्यात २ षटकार ठोकले आणि २०२३ मध्ये, तो भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला. त्याने आतापर्यंत एकूण ४२ षटकार मारले असून रोहित शर्माने ४३ षटकार मारले आहेत. दोन षटकार मारून तो रोहित शर्माला मागे टाकू शकतो.

हेही वाचा – IND vs AUS 1st ODI: श्रेयस अय्यर की शुबमन गिल, चूक कोणाची? रनआउटवर उपस्थित झाले प्रश्न, रैना-मिश्राने दिले ‘हे’ उत्तर

२०२३ मध्ये भारतासाठी सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज –

४३ – रोहित शर्मा<br>४२ – शुभमन गिल
२९ – सूर्यकुमार यादव
२४ – अक्षर पटेल<br>१९ – हार्दिक पांड्या

Story img Loader