Shubman Gill became the fastest to 2000 runs in ODI cricket: शुबमन गिल हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद २ हजार धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरला आहे. गिलने हा विक्रम धरमशाला येथे खेळल्या जात असलेल्या न्यूझीलंडविरुद्ध २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या सामन्यात केला. भारतीय फलंदाजाने दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज खेळाडू हाशिम आमलाला मागे टाकले आहे, ज्याने ४० डावांमध्ये हा आकडा गाठला होता, परंतु गिलने केवळ ३८ डावांमध्ये ही कामगिरी केली. गिलने किवी संघाविरुद्ध १४ धावा करताच हाशिम आमलाचा ​​विक्रम मोडीत काढला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद २,००० धावा पूर्ण करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पाकिस्तानचा माजी दिग्गज झहीर अब्बास, इंग्लंडचा माजी फलंदाज केविन पीटरसन, सध्याचा पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि दक्षिण आफ्रिकेचा सध्याचा मधल्या फळीतील फलंदाज रॅसी व्हॅन डर डुसेन यांचा समावेश आहे. या सर्व फलंदाजांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये २,००० धावांचा आकडा गाठण्यासाठी ४५ डाव खेळले होते. मात्र गिलने सर्वांना मागे टाकत हा विक्रम नोंदवला आहे.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद २,००० धावा पूर्ण करणारे फलंदाज –

३८ डाव- शुबमन गिल<br>४० डाव- हाशिम आमला
४५ डाव- झहीर अब्बास
४५ डाव- केविन पीटरसन
४५ डाव- बाबर आझम
४५ डाव- रॅसी व्हॅन डर ड्युसेन

हेही वाचा – Sachin Tendulkar: मास्टर ब्लास्टरच्या पुतळ्याचे वानखेडे स्टेडियममध्ये एक नोव्हेंबरला होणार अनावरण, अहमदनगरमध्ये सुरू आहे काम, पाहा VIDEO

गिलने २४ वर्षे ४४ दिवसांत २,००० एकदिवसीय क्रिकेटमध्ये धावा पूर्ण केल्या –

शुबमन गिलने वयाच्या २४ वर्षे आणि ४४ दिवसात एकदिवसीय क्रिकेटमध्ये २,००० धावा पूर्ण केल्या. ही धावसंख्या गाठणारा तो सर्वात तरुण फलंदाज ठरला. त्याचबरोबर ही कामगिरी करणारा भारताचा पाचवा सर्वात तरुण फलंदाज ठरला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये २,००० धावा पूर्ण करणारा भारताचा सर्वात तरुण फलंदाज सचिन तेंडुलकर आहे, ज्याने २० वर्षे आणि ३५४ दिवसांत हा पराक्रम केला होता.

सर्वात कमी वयात एकदिवसीय क्रिकेटमध्ये २,००० धावा पूर्ण करणारे फलंदाज (भारतीय) –

२० वर्षे, ३५४ दिवस – सचिन तेंडुलकर
२२ वर्षे, ५१ दिवस – युवराज सिंग
२२ वर्षे, २१५ दिवस – विराट कोहली<br>२३ वर्षे, ४५ दिवस – सुरेश रैना
२४ वर्षे, ४४ दिवस – शुबमन गिल