Shubman Gill Father Statement: शुबमन गिल आपल्या जुन्या विस्फोटक फॉर्मात परतला असून शानदार फलंदाजीचे प्रदर्शन त्याने पुन्हा एकदा केले आहे. शुबमनने धरमशाला येशील कसोटीत पहिल्या डावात शतक झळकावत १५० चेंडूंत ५ षटकार आणि १२ चौकारांच्या मदतीने ११० धावा केल्या. त्याच्या इंग्लंडविरूध्दच्या कसोटीतील दुसऱ्या शतकानंतर त्याचे क्रिकेटमधील पहिले गुरू आणि वडील लखविंदर गिल यांनी त्याच्या तिसऱ्या क्रमांकावरील फलंदाजीवर वक्तव्य केले आहे.

इंग्लंडविरूध्दच्या पहिल्या कसोटीनंतर शुबमन गिलवरील दबाव खूपच वाढला होता. दुसऱ्या कसोटीतील शतकापूर्वीच्या १२ डावांमध्ये त्याने एकही अर्धशतक केले नव्हते ना त्याने आक्रमक खेळ दाखवला होता. पण दुसऱ्या कसोटीत शतक झळकावत त्याने जोरदार पुनरागमन केले. यशस्वी जैस्वालच्या कसोटीमधील पदार्पणानंतर सलामीवीर गिलला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरावे लागले.

Devendra Fadnavis, Mahesh Landge,
“महेश लांडगे यांचा कुणी बालही बाका करू शकत नाही”, असं देवेंद्र फडणवीस का म्हणाले?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Shubman Gill injury update ahead Border Gavaskar Trophy
Shubman Gill : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पर्थ कसोटीतून शुबमन गिल बाहेर? पहिल्या सामन्यापूर्वीच भारताची वाढली डोकेदुखी
delivery boy
“डिलिव्हरी बॉयचा संघर्ष कधीच कुणाला दिसत नाही!” VIDEO होतोय व्हायरल; नेटकरी म्हणाले ” डिलिव्हरी बॉयचा आदर करा”
Sanju Samson father Viswanath video viral
Sanju Samson : ‘३-४ लोकांमुळे माझ्या मुलाची १० वर्षें वाया गेली…’, संजू सॅमसनच्या वडिलांचे धोनी-विराटसह रोहित शर्मावर गंभीर आरोप, VIDEO व्हायरल
accountability of devendra fadnavis declined due to his divisive politics says supriya sule
फोडाफोडीच्या राजकारणामुळे फडणवीसांची विश्वसनीयता कमी; सुप्रिया सुळे
Pankaja Munde At Rally In Parali Beed.
“डोळ्यांसमोर कमळ येईल, पण तुम्ही घड्याळाचेच बटन दाबा…” धनंजय मुंडेंच्या समोरच काय म्हणाल्या पंकजा? पाहा व्हिडिओ
Gautam Gambhir Press conference Team is prepared with Abhimanyu Easwaran and KL Rahul as potential replacements for the opening slot
Gautam Gambhir : रोहित शर्मा नाही तर कोण…? बुमराह नेतृत्व करणार अन् ‘हा’ खेळाडू देणार सलामी, गौतम गंभीरने केलं स्पष्ट

गिलचे वडील लखविंदर यांनी त्याच्या पुनरागमनाचे श्रेय गोलंदाजांना डावलून त्याने आक्रमक खेळी करण्याच्या निर्णयाला दिले आहे. या पध्दतीची खेळी तो १६ वर्षांखालील क्रिकेट खेळत असतानाच त्याने अंगीकारली होती.त्याचे वडील पीटीआय शी बोलताना म्हणाले, ‘ बाहेर येऊन खेळल्याने खूप मोठा फरक पडला आहे. तुम्ही जर नेहमी खेळता तसा नैसर्गिक खेळ खेळत नसाल तर त्याचा दबाव निर्माण होतो. तो १६ वर्षांखालील क्रिकेटच्या दिवसांमध्ये फिरकीपटू आणि वेगवान गोलंदाजांसमोर बाहेर येत आक्रमक खेळी करत असे.’

यासोबतच गिलच्या वडिलांनी त्याच्या तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याच्या निर्णयावर वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की त्याच्या क्रिकेट खेळण्याच्या शैलीसाठी सलामीसाठी उतरणे अधिक योग्य ठरेल. ते म्हणाले, “त्याने सलामीला उतरणंच कायम ठेवलं पाहिजे होतं. मला त्याचा हा निर्णय अजिबात पटलेला नाही. आपण ड्रेसिंग रूममध्ये जास्त वेळ बसलो की दबाव वाढत. तिसरा क्रमांक म्हणजे ना सलामीसाठी उतरणं असतं ना मधल्या फळीतील क्रमांक आहे.”

गिलच्या तिसऱ्या क्रमांकाबद्दल त्याच्या वडिलांचे असे मत असले तरी शुबमनच्या या निर्णयाचा त्यांनी आदर व्यक्त केला आणि क्रिकेट म्हणून त्याची परिपक्वता लक्षात घेतली. याबद्दल सांगताना लखविंदर गिल म्हणाले, “मी त्याने घेतलेल्या निर्णयांमध्ये हस्तक्षेप करत नाही. मी फक्त त्याच्यासोबत प्रशिक्षणासाठी उपस्थित असतो.तो स्वत:चे निर्णय घेण्याइतका मोठा नक्कीच आहे.तो लहान असतानाच मी त्याचे निर्णय घेत होतो.”