IND vs ENG Shubman Gill Record with Century: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या आधी, भारतीय संघाचा युवा फलंदाज शुबमन गिल जबरदस्त फॉर्मात आहे आणि त्याने इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत दमदार कामगिरी केली आहे. एकदिवसीय मालिकेत त्याने तिन्ही सामन्यांमध्ये ५० अधिक धावांचा आकडा गाठला आहे. तर तिसऱ्या वनडे सामन्यात त्याने शतक झळकावत अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात शुबमन गिलने डावाच्या सुरुवातीपासूनच चांगली फलंदाजी केली. त्याने १०२ चेंडूत १४ चौकार आणि तीन षटकारांसह १२२ धावा केल्या. त्याने आपल्या वनडे कारकिर्दीतील सातवे शतक झळकावले. गिलने विराट कोहली आणि श्रेयस अय्यरबरोबर चांगली भागीदारी रचत भारताला मोठ्या धावसंख्येकडे नेण्यात मोठी भूमिका बजावली.

महत्त्वाचं म्हणजे गिलच्या एकदिवसीय कारकिर्दीतील हा ५० वा एकदिवसीय सामना होता आणि ५०व्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकवणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. याआधी भारताचा कोणताही फलंदाज अशी कामगिरी करू शकला नव्हता. गिलने २०२० मध्ये वनडे क्रिकेटमध्ये भारताकडून पदार्पण केले होते. तेव्हापासू एक महत्त्वाचा खेळाडू म्हणून आपली जागा त्याने निर्माण केली आहे.

गिलने २०२३ मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सामन्यातही त्याने द्विशतक झळकावले होते. आतापर्यंत त्याने टीम इंडियासाठी ५० एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण २५८७ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याने ७ शतकं आणि १५ अर्धशतकं केली आहेत.

शुभमन गिल हा एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद २५०० धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने ५० डावात ही कामगिरी केली आहे. याशिवाय गिलने ५० डावातच ७ एकदिवसीय शतकं झळकावली आहेत. सर्वात कमी डावात ७ वनडे शतकं करणारा गिल हा पिहला भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने शिखर धवनचा विक्रम मोडला आहे. धवनने ५४ एकदिवसीय डावात ७ शतकं झळकावली होती.

सर्वात कमी डावात ७ वनडे शतकं झळकावणारे भारतीय फलंदाज

शुभमन गिल- ५० डाव
शिखर धवन- ५४ डाव
विराट कोहली- ६३ डाव
केएल राहुल- ६६ डाव

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shubman gill first indian player to score century in 50th odi and the quickest in terms of innings to seven odi centuries ind vs eng bdg