India vs England Second Test Match Updates : शुबमन गिलने पुन्हा एकदा चाहत्यांची निराशा केली आहे. विशाखापट्टणम कसोटीच्या पहिल्या डावात तो भारतासाठी विशेष काही करू शकला नाही. शुबमन अवघ्या ३४ धावा करून बाद झाला. तो खराब फॉर्ममधून जात आहे. जेम्स अँडरसनने शुबमनला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. शेवटच्या कसोटीतही तो स्वस्तात बाद झाला होता. आता पुन्हा एकदा दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात गिल लवकर बाद झाल्याने सोशल मीडियावर यूजर्सकडून ट्रोल केले जाऊ लागले आहे.

वास्तविक, इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल सलामीला आले होते. रोहित १४ धावा करून बाद झाला. रोहित बाद झाल्यानंतर शुबमन आला होता. तो ४६ चेंडूत ३४ धावा करून बाद झाला. त्याने पाच चौकार मारले. अँडरसन इंग्लंडकडून २९ वे षटक टाकत होता. या षटकाच्या पाचव्या चेंडूवर शुबमनला फॉक्सच्या झेलबाद केले.

Shreyas Iyer came to bat with Sunglasses brutally trolled
Duleep Trophy 2024 : गॉगल घालून बॅटिंगला उतरला, भोपळ्यासह तंबूत परतल्याने श्रेयस अय्यर होतोय ट्रोल
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Sunil Gavaskar slams Michael Vaughan for comment on Test cricket
Sunil Gavaskar Michael Vaughan : कसोटीत रुटने सचिनला मागे टाकले तर काय बदलेल? मायकेल वॉनच्या वक्तव्याला सुनील गावसकरांनी दिले चोख प्रत्युत्तर
Duleep Trophy Ishan Kishan 7th first class century
इशान किशनचे झंझावाती शतकासह निवडसमितीला प्रत्युत्तर; दुलीप ट्रॉफी सामन्यात चौकार-षटकारांची लयलूट
Afghanistan Cricket Team Is Very Unhappy With Facilities Of Greater Noida Stadium
AFG vs NZ: “आम्ही इथे कधीच परत येणार नाही…”, ग्रेटर नोएडा स्टेडियमच्या गैरव्यवस्थापनावर अफगाणिस्तान संघ संतापला, नेमकं काय घडलं?
Duleep Trophy 2024 Who is Manav Suthar
Manav Suthar : दुलीप ट्रॉफीमध्ये ७ विकेट्स आणि ७ मेडन ओव्हर्स टाकणारा…कोण आहे मानव सुथार? जाणून घ्या
MS Dhoni opened up about his bond with Virat
MS Dhoni : ‘वयाचा फरक असला तरी, मी त्याचा…’, विराटबरोबरच्या नात्याबद्दल माही पहिल्यांदाच झाला व्यक्त, VIDEO व्हायरल
jonty rhodes air india flight late over an hour and a half he is wait at mumbai airport
Jonty Rhodes : जॉन्टी ऱ्होड्सने नाराजी व्यक्त केल्यानंतर एअर इंडियाने मागितली माफी, नेमकं काय आहे प्रकण?

यानंतर गिलला सोशल मीडियावर यूजर्सकडून ट्रोल केले जाऊ लागले. एका यूजरने सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले, शुबमन गिल पुन्हा एकदा फ्लॉप ठरला. याशिवाय दुसऱ्या सामन्यात सरफराज खानला संधी न दिल्याने आणि गिलला खेळवल्याबद्दलही त्याला खूप ट्रोल केले जात आहे. आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर शुबमन गिलला कसोटी संघातून वगळण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

हेही वाचा – IND vs ENG : यशस्वीने विशाखापट्टणममध्ये झळकावलं दमदार शतक, श्रेयस अय्यरसह सावरला भारतीय संघाचा डाव

या सामन्याच्या दुसऱ्या डावातही गिलची बॅट चालली नाही, तर त्याला कसोटी संघातून बाहेर केले जाऊ शकते. गिलला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळाल्यापासून त्याची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी ढासळत चालली आहे. त्यामुळे टीम इंडियाचा तणावही थोडा वाढू लागला आहे.

या सामन्यात भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्येही बदल दिसून आले. भारतीय संघात तीन बदल करण्यात आले. दुसऱ्या कसोटी सामन्यात मुकेश कुमार, कुलदीप यादव आणि रजत पाटीदार यांचा समावेश करण्यात आला. हैदराबाद कसोटीनंतर या सामन्यातून गिलला वगळले जाण्याची शक्यता होती. कारण गेल्या अनेक कसोटी डावांमध्ये शुबमन गिल सतत फ्लॉप ठरत आहे. त्यानंतर संघातून त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी जोर धरू लागली.