Shubman Gill has won the ICC Player of the Month award: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील विश्वचषक सामन्यापूर्वी शुबमन गिलने आयसीसीचा पुरस्कार पटकावला आहे. त्याची सप्टेंबर महिन्यातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू म्हणून निवड झाली आहे. गिलने सप्टेंबर महिन्यात एकदिवसीय सामन्यात ८० च्या सरासरीने ४८० धावा केल्या आणि हा पुरस्कार जिंकला. गिल व्यतिरिक्त मोहम्मद सिराज आणि डेव्हिड मलान हे देखील हा पुरस्कार जिंकण्याच्या शर्यतीत होते, पण शेवटी गिलनेच बाजी मारली आहे. हा पुरस्कार भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी त्याचा आत्मविश्वास वाढवेल.

सलामीच्या फलंदाजाने आशिया कपमध्ये ७५.५ च्या सरासरीने ३०२ धावा केल्या होत्या, ज्यामध्ये अंतिम सामन्यात नाबाद २७* धावा केल्या होत्या. भारताने फायनलमध्ये श्रीलंकेचा १० गडी राखून पराभव केला. गिल या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन डावांत १७८ धावा करून गिलने महिन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू (आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ) होण्याचा आपला दावा आणखी मजबूत केला. यासोबतच विश्वचषकाच्या तयारीचे संकेतही दिले.

IND vs BAN Rohit Sharma on KL Rahul and Sarfaraz Khan ahead 1st Test match
IND vs BAN : केएल राहुल की सर्फराझ खान? रोहित शर्माने केले स्पष्ट; ‘या’ खेळाडूला मिळणार प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Bangladesh Captain Big Statement Ahead of IND vs BAN test Series
IND vs BAN: “ते क्रमवारीत पुढे असले तरी…”, कसोटी मालिकेआधी बांगलादेशच्या कर्णधाराचं भारतीय संघाला आव्हान, नेमकं काय म्हणाला?
Virat Kohli Breaks Wall of Chepauk Dressing Room During Practice Session In Chennai
Virat Kohli: कोहलीचा विषय लय हार्डय! विराट कोहलीच्या एका शॉटने भिंतीला पाडलं भगदाड, VIDEO व्हायरल
Duleep Trophy 2024 Akashdeep Statement on Mohammed Shami Gives Credit to His Advice After Taking 9 Wickets Haul
Duleep Trophy 2024: आकाशदीपला मोहम्मद शमीने दिला होता गुरूमंत्र, दुलीप ट्रॉफीतील सामन्यात ९ विकेट्स घेतल्यानंतर केला खुलासा
unil Gavaskar statement regarding the series in Australia that India is expected to dominate sport news
भारताचेच वर्चस्व अपेक्षित! ऑस्ट्रेलियातील मालिकेबाबत गावस्करांचे भाकीत
Priyansh Arya hitting six consecutive sixes in an over
DPL 2024 : ६,६,६,६,६,६…भारताच्या ‘या’ फलंदाजाने केला युवराजसारखा पराक्रम, विक्रमी शतकासह धावसंख्येचाही विक्रम
Mushfiqur Rahim player of match prize money donates
PAK vs BAN : पाकिस्तानविरुद्धच्या ऐतिहासिक विजयानंतर मुशफिकर रहीमने घेतला मोठा निर्णय, जिंकली चाहत्यांची मनं

गिलने सप्टेंबरमध्ये ४८० धावा करताना झळकावली दोन शतके –

सप्टेंबरमध्ये आशिया चषकादरम्यान बांगलादेशविरुद्ध १२१ धावा केल्यानंतर उजव्या हाताच्या फलंदाजाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात १०४ धावा केल्या. गिलने गेल्या महिन्यातही तीन अर्धशतके झळकावली होती आणि त्या कालावधीत आठ डावात केवळ दोन वेळा तो पन्नासपेक्षा कमी धावांवर बाद झाला होता. त्याने दोन शतकांच्या जोरावर सप्टेंबरमध्ये ४८० धावा केल्या आहेत.

हेही वाचा – IND vs PAK, World Cup 2023: भारत-पाक सामन्याबद्दल शोएब अख्तरचं मोठं वक्तव्य; म्हणाला, “हा सामना कमकुवत…”

२४ वर्षीय या खेळाडूने ३५ सामन्यांमध्ये ६६.१ च्या सरासरीने आणि १०२.८४ च्या स्ट्राइक रेटने १९१७ धावा करून एकदिवसीय सामन्यांमध्ये अविश्वसनीय विक्रम केला आहे. तो आयसीसी पुरुषांच्या वनजे फलंदाजी क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. गिल डेंग्यूच्या आजारपणामुळे क्रिकेट विश्वचषकात भारताचे सुरुवातीचे सामने खेळू शकला नाही, मात्र पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात तो खेळेल अशी अपेक्षा आहे. भारतीय संघातील उर्वरित खेळाडूंपूर्वी तो अहमदाबादला पोहोचला आणि गुरुवारी तासभर सरावही केला.