Shubman Gill In Ind vs Pak Health Update: विश्वचषक 2023 मधील ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान विरुद्ध भारताचे पहिल्या दोन सामन्यांमधून दूर राहिलेला शुबमन गिल शनिवारी सुद्धा पुन्हा संघात परतण्याची शक्यता कमी झाली आहे. शनिवार १४ ऑक्टोबरला अहमदाबाद मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान हा हाय-व्हॉलटेज सामना रंगणार आहे. पण डेंग्यूची लागण झाल्याने शुबमनला या सामन्यात खेळण्याची संधी सुद्धा गमवावी लागणार असल्याचे समजतेय. बीसीसीआयने सोमवारी शुबमनच्या आरोग्याविषयी अपडेट देत सांगितले की गिलच्या शरीरातील प्लेटलेट्स कमी झाल्यामुळे सध्या त्याला चेन्नईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कावेरी रुग्णालयात भारताच्या स्टार खेळाडूवर उपचार सुरु आहेत.

बीसीसीआयच्या एका सूत्राने नाव न छापण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, “शुबमन गिल गेल्या काही दिवसांपासून चेन्नईच्या हॉटेलमध्ये राहात होता. मात्र रविवारी त्याच्या शरीरातील प्लेटलेटची संख्या ७०,००० पर्यंत घसरली आणि डेंग्यूच्या रूग्णांच्या बाबतीत, एकदा संख्या १ लाखापेक्षा पेक्षा कमी झाली की, तुम्हाला वैद्यकीय देखरेखीखाली ठेवावे लागते. खबरदारीसाठी रविवारी रात्री त्याला सर्व अनिवार्य चाचण्यांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु सोमवारी संध्याकाळी त्याला डिस्चार्ज मिळाला. “

Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
ajit pawar meets sharad pawar
पहिला मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…
Winter Session Nagpur Maharashtra Assembly Opposition Leader Mahavikas Aghadi
बंगला सज्ज,विरोधी पक्ष नेत्याबाबत अनिश्चितता
Pusad Naik family, Indranil Naik , Vasantrao Naik,
अजित पवारांसोबत गेलेल्या नाईक घराण्याला मंत्रिपदाची भेट ?
bjp sujay patki
पहिली बाजू : आता महाराष्ट्र थांबणार नाही!
abhishek bachchan aishwarya rai
ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन दुसऱ्यांदा आई-बाबा होणार? रितेश देशमुखच्या ‘त्या’ प्रश्नावर अभिनेता म्हणाला…
Vasai-Virar City Municipal Corporation
प्रभारी आयुक्त रमेश मनाळे यांची समाजमाध्यमावर बदनामी

डेंग्यूबाबत चिंतेची गोष्ट अशी की ताप कमी होत असला आणि प्लेटलेट्सची संख्या सुधारली तरी अशक्तपणातून शरीर सावरायला वेळ लागतो. त्यामुळे गिलच्या प्रकृतीत सुधारणा होऊन त्याला डिस्चार्ज मिळाला तरी अहमदाबादला होणाऱ्या भारत- पाक सामन्यात त्याचा समावेश असणं हे अशक्यच दिसत आहे. याचे एक कारण म्हणजे समजा जरी १२ किंवा १३ तारखेला गिल अहमदाबादला पोहोचला तरी त्याला अजिबातच सराव मिळणार नाही. अशावेळी बीसीसीआय त्याला घाईघाईने बोलावण्याची शक्यता कमी वाटते.

हे ही वाचा<< World Cup 2023 च्या सर्व सामन्यांमध्ये ‘Jarvo 69’ ला बंदी! ICC चा कठोर निर्णय, पण जार्वो आहे तरी कोण?

दरम्यान, पाकिस्तान विरुद्ध सामन्यात गिल वेळेत सावरला नाही तर भारताला खऱ्या संकटाला सामोरे जावे लागू शकते. या वर्षी ७२.३५ च्या सरासरीने १२३० धावा करणारा तो भारताचा सर्वात फॉर्मात असलेला फलंदाजच आहे. शिवाय गुजरात टायटन्ससाठी आयपीएलमध्ये खेळताना हे त्याचे होमग्राउंड होते, अहमदाबादचे मैदान गिलसाठी सरावाचे आहे. त्यामुळे त्याच्याकडून या मैदानात उत्तम खेळी पाहायला मिळाली असती पण आता या सर्व आशा मावळताना दिसत आहेत.

Story img Loader