Rahul Dravid on Shubman Gill: न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेतील शेवटच्या सामन्यात शुबमन गिलने ११२ धावांची शानदार खेळी केली. त्याने कर्णधार रोहित शर्मासोबत २१२ धावांची सलामी भागीदारी केली आणि टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली. गिलचे गेल्या चार एकदिवसीय सामन्यांमधील हे तिसरे शतक ठरले. यापूर्वी त्याने श्रीलंकेविरुद्ध शतक झळकावले होते आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात २०८ धावा केल्या होत्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राहुल द्रविडने करून दिली वडीलांची आठवण

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वन डे मालिकेतील शेवटच्या सामन्यानंतर भारतीय प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी शुबमन गिलची मुलाखत घेतली. यादरम्यान द्रविडने गिलला शुभेच्छा दिल्या आणि त्याच्या उत्कृष्ट फॉर्मचे मजेदार कारणही सांगितले. द्रविडने आठवण करून दिली की, जेव्हा शुबमन गिल चांगली फलंदाजी करत होता पण अर्धशतक झळकावून बाद होत होता, तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला विचारले की, “तू रिमझिम पावसासारखा खेळणार आहेस की, वादळी वाऱ्यासारखी जोरदार धावांचा पाऊस पाडून मोठी शतकेही ठोकणार आहेस.” यानंतर द्रविडने त्याच्या या घटनेची आठवण करून देत म्हणाला की, “गेल्या एका महिन्यात तू जे काही केलेस, तू खरोखरच धावांचा पाऊस पाडलास. तुझ्या वडिलांना तुझा आता अभिमान वाटेल.”

शुबमन गिलने रोहित-विराटचे मानले आभार

गिल म्हणाला, “मला वाटत नाही की माझे वडील या सामन्याबद्दल खूप खूश असतील. मी शतक झळकावल्यानंतर चांगली फलंदाजी करावी आणि एकदिवसीय सामन्यात माझे दुसरे द्विशतक झळकावण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.” यावर द्रविड म्हणाला की, “तू योग्य हातात आहेस, जर तू स्वत:ला चांगले करण्यासाठी पुढे ढकलत नाहीस तर तुझे वडील ते काम करतात. ही बाब खूप महत्वाची आहे.”

हेही वाचा: IND vs NZ: १८ महिन्यांनंतर एकत्र आलेले कुलचा जोमात बाकी कोमात! चहलने कुलदीपच्या काढलेल्या खोडीचा Video व्हायरल

द्रविडने गिलला विचारले की, “बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेपासून तू खूप लयीत आहेस. गेल्या सहा डावांत तीन शतके झळकावली आहेत. तुला आता कसे वाटते आहे? याला उत्तर देताना गिल म्हणाला की, “मला एकदिवसीय सामन्यांमध्ये फलंदाजी आवडते. तो सुरुवातीला वेळ घेऊन खेळपट्टी कशी आहे याचा अंदाज पाहून मी फलंदाजी करतो. त्यानंतर मग मी माझा नैसर्गिक खेळ दाखवतो.” शुबमन पुढे म्हणाला की, “श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी मी खेळेल की नाही हे माहित नव्हते, पण द्रविड तुम्ही आणि कर्णधार रोहितने दाखवलेल्या विश्वास मला खूप चांगली खेळी करायला खूप बळ देऊन गेला, सध्या त्याचा आनंद घेत आहे.” यावर द्रविड म्हणाला की, “प्रशिक्षकाचे कौतुक करून तू खूप चांगले काम केले आहेस.”

गिलने प्रशिक्षक द्रविडला विचारले की, “गेल्या ५-६ वर्षांत तुम्ही मला पाहिले आहे, माझ्यात काय बदल झाला आहे.” यावर द्रविड म्हणाला की, “तुम्हाला नेहमी धावा आणि फलंदाजी करण्याची भूक होती, पण गेल्या ७-८ महिन्यांत तुझ्यात सर्वात मोठा बदल तुमच्यातील क्षेत्ररक्षणामुळे झाला आहे. स्लिम होण्यासाठी तुम्ही सतत सराव करत आहात आणि स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करत राहतात. तुमच्यात अगोदरच कौशल्य होते, पण आता त्यात भर पडली ती धावांची भूक. जेव्हा तुम्ही एकदिवसीय मध्ये फलंदाजी करता तेव्हा तुम्ही रोहित आणि विराटकडून खूप काही शिकू शकतात, ही तुमच्यासारख्या नवोदितांसाठी एक मोठी संधी आहे.”

हेही वाचा: Michael Vaughan on Team India: वर्ल्ड कप २०२३ साठी टीम इंडिया फेव्हरेट! मायकेल वॉर्नने इंग्लंडसहित सर्व संघाला दिला इशारा

याला उत्तर देताना शुबमन म्हणाला की, “या दोन्ही खेळाडूंची फलंदाजी पाहून मी मोठा झालो आहे. आता त्याच्यासोबत फलंदाजी करून माझ्या मनाला अधिक आनंद झाला आहे. आज जेव्हा रोहित भाई ७०-८० धावांवर फलंदाजी करत होता आणि डॅरिल मिशेल गोलंदाजीसाठी आला तेव्हा रोहित म्हणाला की, “हा गोलंदाज माझी विकेट घेऊ शकतो पण मी त्याच्या चेंडूंवर धावा करण्याचा प्रयत्न करेन. अशा आक्रमक विचारसरणीने ज्यावेळेस तुम्ही खेळता तेव्हा तुमचे धोरण स्पष्ट होते.”

इंदोरच्या ड्रेसिंगरूमला राहुल द्रविडचे नाव

गिलने द्रविडला विचारले की, “तुमच्या नावाच्या ड्रेसिंग रुममध्ये जाताना तुम्हाला कसे वाटते?” यावर द्रविड म्हणाला की, “मी भाग्यवान आहे की मला भारताकडून खेळण्याची संधी मिळाली. माझ्याकडे टीम इंडियामध्ये स्थान मिळवण्याची क्षमता होती आणि मी भारतासाठी दीर्घकाळ खेळू शकलो. हे माझे सौभाग्य आहे. लोकांनी वर्षानुवर्षे खूप प्रेम दिले आहे. ही माझ्यासाठी अधिक भाग्याची गोष्ट आहे. कधीकधी ते ओशाळल्यासारखे देखील असते.” पुढे राहुल म्हणाला की. “तुमच्यासाठी, मी म्हणेन की रोहित आणि कोहली यांच्यासोबत जेवढा वेळ घालवता येईल तेवढा घाला आणि फलंदाजी करत शिकत राहा. जोपर्यंत दोघेही क्रीझवर आहेत तोपर्यंत बाद होऊ नका. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shubman gill interview shubman gill is raining centuries after hearing fathers taunt coach dravid revealed avw